Sanjay Raut News : वायफळ बडबड करण्यापेक्षा... ; कोर्टाने राऊतांना फटकारलं

Malegaon Court Lashes Out on Sanjay Ruat : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ...
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Sanjay Raut Nashik News :

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना नाशिक जिल्ह्यातील मालेगाव कोर्टाने फटकारले आहे. संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले आहेत. गिरणा कारखान्यात मंत्री दादा भुसे यांनी 178 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी केलेल्या घोटाळ्याच्या आरोपांविरोधात दादा भुसे यांनी मालेगाव कोर्टात मानहानीचा दावा दाखल केला होता. या प्रकरणी कोर्टाने गेल्या 2 डिसेंबरला संजय राऊत यांना जामीन दिला होता. या प्रकरणी आज नियमित सुनावणी होती. पण या सुनावणीला Sanjay Raut हजर झाले नाहीत. यावरून कोर्टाने नाराजी व्यक्त करत राऊत यांना फटकारले आहे.

Sanjay Raut
Chhagan Bhujbal news : ' ...त्यांनी थोडा गोळीबार करायला सांगितला होता!'; गृहमंत्री फडणवीसांच्या मदतीला धावले भुजबळ

कोर्टाने काय म्हटले?

दादा भुसे यांनी संजय राऊत यांच्यावर दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्या प्रकरणी मालेगाव कोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीला संजय राऊत गैरहजर होते. या सुनावणीला उपस्थित असलेल्या मंत्री भुसे यांनी कोर्टात आपली साक्ष नोंदवली. तर गैरहजर राहिलेल्या राऊतांवर कोर्टाने नाराजी व्यक्त केली. वायफळ बडबड करण्यापेक्षा पुरावे सादर करावे, असे सांगत कोर्टाने संजय राऊत यांना वकिलमार्फत फटकारले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

फौजदारी गुन्हा दाखल होणार?

या प्रकरणात कोर्टाने 23 ऑक्टोबरला हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्या सुनावणीलाही राऊत हे गैरहजर होते. त्यावेळी राऊत यांच्याकडून दसरा मेळाव्याचे कारण देण्यात आले होते. त्यानंतर 4 नोव्हेंबरला कोर्टाने सुनावणी ठेवली होती. तेव्हाही राऊत गैरहजर होते. आता आजच्या सुनावणीला राऊत पुन्हा गैरहजर होते. त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची विनंती कोर्टाला करणार असल्याचे मंत्री दादा भुसे म्हणाले. कोर्टात दादा भुसेंकडून वकील सुधीर अक्कर आणि संजय राऊत यांच्याकडून वकील मधुकर काळे हे काम पाहत आहेत.

गिरणा सहकारी साखर कारखान्याबाबत दादा भुसे यांनी 178 कोटी रुपयांचा शेअर्स घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला होता. दैनिक सामना वृत्तपत्रात संजय राऊत यांनी वृत्त प्रसिद्ध केले होते.

Sanjay Raut
Chandrashekhar Bawankule : 'हा' उपक्रम लोकसभेत भाजपला प्रचाराविना मिळवून देणार 'विजय' ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com