Malegaon Deputy Mayor Row: मालेगाव महापालिका उपमहापौरांच्या कार्यालयात टिपू सुलतान यांची प्रतिमा लावण्यात आली होती. भाजपने त्या विरोधात आवाज उठवला होता. यानिमित्ताने भाजपने राजकीय फायदा उठविण्याचा प्रयत्न केला.
भाजपने मालेगावच्या उपमहापौरांच्या कार्यालयात टिपू सुलतान यांची प्रतिमा लावण्यास प्रखर विरोध केला होता. दोन दिवसांपूर्वी ही प्रतिमा काढल्याने भाजपने त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हे सर्व औटघटकेचे ठरले आहे.
भाजपने या निमित्ताने काँग्रेससह महाविकास आघाडीच्या घटक पक्षांवर टीकेची जोड उठविली होती. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्याचे समर्थन केले होते. विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावरही भाजपने निशाणा साधला.
भाजपला या आंदोलनाचे समाधान मिळण्याआधीच उपमहापौर शानेहिंद निहाल अहमद यांनी त्यांना डिवचले आहे. उपमहापौरांनी भाजपला या विषयावरून चांगलेच सुनावले आहे. कोणत्या विषयाचे राजकारण करावे याचे तारतम्य भाजप विसरला, असे त्या म्हणाल्या.
उपमहापौर कार्यालयाचे नूतनीकरण सुरू आहे. त्यामुळे आम्ही टिपू सुलतान यांची प्रतिमा काढली आहे. नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर ही प्रतिमा पुन्हा लावण्यात येईल. टिपू सुलतान यांच्या नावाने राजकारण करणे ऐवजी भाजपने यापूर्वी काय केले? टिपू सुलतान यांचे समर्थन व नामकरण कुठे कुठे केले? याचे स्मरण करावे, असा टोमणा त्यांनी दिला.
आम्ही समाजवादी पक्षाचे पाईक आहोत. तीच आमची विचारधारा आहे. भारतीय वाद आणि धर्मांधपणा याला आम्ही थारा देत नाही. भाजप देशभरात काय करीत आहे, सत्तेसाठी कसे मुस्लिम विरोधी राजकारण करते, हे सगळ्यांना ठाऊक आहे. अशा पक्षाच्या आंदोलनाला आम्ही घाबरणार नाही, अशी ठाम भूमिका उपमहापौरांनी घेतली.
भारतीय राज्यघटनेने आमच्या कार्यालयात कोणते फोटो लावावेत याचे स्वातंत्र्य आम्हाला दिले आहे. त्यामुळे भाजपने आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करू नये. टिपू सुलतान यांच्याबरोबरच अन्य राष्ट्रपुरुषांचेही फोटो लावले जातील.
दरम्यान लासलगाव येथील सकल मुस्लिम समाजाने यात उडी घेतली आहे. आज या संघटनेकडून छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा उपमहापौरांना कार्यालयात लावण्यासाठी भेट देण्यात येणार आहे. त्यामुळे भाजपने टिपू सुलतान फोटोवरून सुरू केलेल्या राजकारणाचे आव्हान उपमहापौर शानेहिंद यांनी स्वीकारले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.