Jalgaon News: मंदाताई खडसे म्हणाल्या, जिल्हा दूध संघाची चेअरमन मीच!

मंदाताई खडसे यांनी अध्यक्षपदाचा पदभार माझ्याचकडे असल्याचा दावा केला.
Mandakini Khadse
Mandakini KhadseSarkarnama
Published on
Updated on

जळगाव : जळगाव (Jalgaon) जिल्हा सहकारी दूध (District Milk Sangh) उत्पादक संघात आज सत्तेच्या खुर्चीचा वाद चांगलाच रंगला. जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे (Mandakini Khadse) यांनी आज संचालकांसमवेत दूध संघात प्रवेश केला. शेतकऱ्यांच्या (Farmers) दुधाचे रकमेचे पेमेंट केल्याचा दावा त्यांनी केला. दुसरीकडे दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त करून मुख्य प्रशासक म्हणून आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ नियुक्त केल्याचा आदेश शासनाने जारी केला. यामुळे सत्तेच्या खुर्चीचा वाद चांगलाच रंगला. (Disputes is still on district Milk fedration chairmen)

Mandakini Khadse
Dhule news: अतिक्रमणाबाबत शिवसेनेने भाजपच्या महापौरांना धारेवर धऱले!

प्रशासक मंडळाचे सदस्य म्हणून २७ जुलै २०२२ ला अशोक कांडेलकर, अरविंद देशमुख, अमोल शिंदे व अमोल पाटील यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर २८ जुलैला आमदार मंगेश चव्हाण यांनीही मुख्य प्रशासक म्हणून उपस्थित राहून बैठक घेतली.

Mandakini Khadse
NCP News: फळपिकांसाठी हेक्टरी दीड लाखांची तात्काळ मदत द्या!

प्रशासक नियुक्त करण्याच्या याचिकेविरोधात निवडून आलेल्या संचालक मंडळातील जगदीश बढे व इतर सदस्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावर १ ऑगस्टला सुनावणी होऊन खंडपीठाने जिल्हा दूध संघात ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवावी, असे आदेश दिले आहेत.

मंदाकिनी खडसे दूध संघात

जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे आज दुपारी संचालक संजीव पाटील, वसंतराव मोरे आदींसह दूध संघात आल्या. त्यांनी अध्यक्ष म्हणून कार्य केले. त्यांनी शेतकऱ्यांच्या दुधाचे पेमेंट काढल्याचा दावाही केला. त्यांनी कार्यकारी संचालक मनोज लिमये रजेवर गेलेले असल्यामुळे प्रभारी कार्यकारी संचालकपदी काशीनाथ बाबूराव पाटील यांची नियुक्ती केली असल्याचे आदेश जारी करून सर्व विभागप्रमुखांनी त्यांना सहकार्य करावे, असे पत्रही जारी केल्याचे सांगण्यात आले. कामकाज आटोपन त्या व संचालक निघून गेले.

जिल्हा दूध संघात मंदाताई खडसे यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी संचालक सजीव पाटील, वसंतराव मोरे उपस्थित होते. या वेळी त्या म्हणाल्या, की अध्यक्ष म्हणून माझ्याकडेच पदभार आहे. जर मी पदभार कुणाकडे सोपविलाच नाही, तर आजही अध्यक्ष मीच आहे.

त्या म्हणाल्या, कार्यकारी संचालकांना पदभार देण्याबाबत कोणतेही अधिकार दिलेलेच नाही. न्यायालयाने ‘जैसे थे’आदेश दिलेले आहेत. आज रोजी मी कोणालाही पदभार दिलेला नाही. त्यामुळे मीच अध्यक्ष आहे. आमचे संचालक मंडळ कार्यरत आहे. शेतकऱ्यांचे दूध पेमेंट करावयाचे होते, त्यामुळे मी संचालक मंडळाला पाचारण करून सांगितले. आपल्याला शेतकऱ्यांचे दूध पेमेंट करावे लागेल, त्यानुसार आपण दूध पेमेंट केले आहे. १९ ऑगस्टपर्यंत जिल्हा दूध संघाचा कारभार आम्हीच पाहणार आहोत.

न्यायालयात आम्ही सांगितले, की आम्हाला प्रशासक मंडळ बरखास्तीची कोणतीही नोटीस मिळालेली नसल्यामुळे आम्ही ताबा सोडलेला नाही. त्यामुळे आमच्याकडेच ताबा आहे. ‘जैसे थे’आदेशामुळे ताबा संचालक मंडळाकडेच असतो. आम्हाला सोशल मीडियावरून बरखास्तीबाबत माहिती मिळाल्याने आमचे संचालक त्या विरुद्ध न्यायालयात गेले होते. आम्हीच संचालक म्हणून १९ ऑगस्टपर्यंत कारभार पाहणार आहोत. त्यानंतर न्यायालयाचा जो निकाल येईल तो आम्हाला मान्य असेल.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com