Mangesh Chavan Politics: वसुली अंगलट...आमदार चव्हाण यांचे रौद्र रूप पाहून अधिकाऱ्यांना फुटला घाम

Mangesh Chavan; Panchayat Samiti officials recovered thousands from farmers- घरकुल आणि विहीरी मंजूर झालेल्या शेतकऱ्यांकडून सुरू होती हजारो रूपयांची वसुली.
Mangesh Chavan
Mangesh ChavanSarkarnama
Published on
Updated on

Mangesh Chavan News: भ्रष्टाचार आणि अधिकाऱ्यांकडून होणारी वसुली नित्याची असते. अनेकांना ती अंगवळणी झाली आहे. मात्र चाळीसगाव पंचायत समितीत अधिकाऱ्यांनी सर्व पातळ्या ओलांडल्या होत्या. शेतकऱ्यांमध्ये या वसुलीमुळे संतापाचे वातावरण होते.

चाळीसगाव तालुक्यात साडे चार हजार विहिरी आणि घरकुले मंजूर होती. आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्यातून हे काम झाले. मात्र लाभार्थी शेतकऱ्यांकडून पंचायत समितीचे अधिकारी प्रत्येकी २० ते २५ हजार रुपयांची वसुली करीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

Mangesh Chavan
Chandrashekhar Bavankule Politics: मंत्र्यांनाही विकासकामांत मागे टाकणारा 'तो' आमदार आहे तरी कोण?

संबंधित शेतकऱ्यांनी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे ही कैफियत मांडली. त्यावेळी शेतकऱ्यांच्या समस्येचे नेमके निदान करीत आमदार चव्हाण यांनी थेट पंचायत समिती कार्यालय गाठले. यावेळी त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना धारेवर धरीत वसुली करणाऱ्या अधिकाऱ्यांना हजर करा अशी तंबीच दिली.

Mangesh Chavan
Vasant Gite Politics: शिवसेना ठाकरे पक्षाचा महापालिकेला कडक इशारा, खाजगीकरण थांबवा अन्यथा...

आक्रमक आमदार चव्हाण आणि सोबत प्रत्यक्ष पैसे दिलेले शेतकरी तक्रार करत असल्याने अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. यावेळी अधिकाऱ्यांनी सर्व करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर आमदार चव्हाण यांनी या सबंध प्रशासनाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करीत दोन दिवसात याबाबत कारवाई करण्याच्या सूचना केल्या.

एवढ्यावर न थांबता आमदार चव्हाण यांनी थेट शेजारीच असलेले पोलीस ठाणे गाठले. त्यांनी रीतसर पोलीस निरीक्षकांकडे याबाबतची तक्रार केली. दोन दिवसात संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती संकलित करावी. या सर्व पैसे वसुली करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधक गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.

ध्यानीमनी नसताना आणि अधिकारी पैसे वसुलीत मग्न असताना हा सर्व घटनाक्रम झाला. त्यामुळे पंचायत समिती कार्यालयातील कनिष्ठ अभियंता आणि संबंधित अधिकारी अक्षरशः थरथर कापत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या संदर्भात दोन दिवसात कारवाई करून वसुली करणाऱ्या शेतकऱ्यांना चक्की दिसायला लाऊ, असा इशार आमदार चव्हाण यांनी दिला.

आमदार चव्हाण यांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे ते सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी हिरो ठरतात की काय अशी स्थिती आहे. यात सामान्य जनता आणि शेतकऱ्यांकडून राजरोसपणे पैसे मागितले जातात. पैसे दिल्याशिवाय कोणतेच काम होत नाही अशी आजची स्थिती आहे. यात सरकारही तेवढेच जबाबदार असल्याने ते आपली जबाबदारी टाळू शकत नाही. सत्ताधारी आमदारानेच हे सर्व रॅकेट उघडे केल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com