Manikrao Kokate Politics: मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मार्गात भाऊबंदकीचा अडसर, सख्ख्या भावाकडूनच मिळणार आव्हान!

Manikra Kokate; Minister Kokate's brother Bharat Kokate will join Shiv Sena Eknath Shinde party-जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मंत्री कोकाटे यांच्या कन्या सीमांतिनी कोकाटे यांना यंदा भाऊबंदकीचे आव्हान!
Manikrao Kokate, Simantini Kokate & Bharat Kokate
Manikrao Kokate, Simantini Kokate & Bharat KokateSarkarnama
Published on
Updated on

Manikrao Kokate News: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजकीय वारसदार म्हणून कन्या सीमांतिनी कोकाटे यांच्याकडे पाहिले जाते. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत सीमांतिनी कोकाटे उमेदवार असतील. मात्र आतापासूनच त्यांच्या मार्गात राजकीय अडथळे निर्माण होऊ लागले आहेत.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत घरातूनच विरोध झाला होता. गेली काही वर्ष त्यांचे सख्खे भाऊ भारत कोकाटे आणि मंत्री कोकाटे यांच्या कुटुंबीयांत मतभेद निर्माण झाले आहे. त्याचा या कुटुंबाच्या राजकीय प्रवासावरही परिणाम झाला.

लोकसभा निवडणुकीच्या आधी भारत कोकाटे यांनी मंत्री कोकाटे यांना थेट आव्हान दिले होते. कोकाटे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात प्रवेश केला. खासदार राजाभाऊ वाजे यांच्या गटात दाखल होत त्यांनी कोकाटे यांना तालुक्यात ठिकठिकाणी विरोध करीत आव्हान दिले होते.

Manikrao Kokate, Simantini Kokate & Bharat Kokate
Uddhav Thackrey Politics: ठाकरे बंधूंच्या युतीसाठी मनमाडच्या शिवसेना नेत्यांनी पदयात्रा काढत घातले शनि देवाला साकडे!

जिल्हा मजूर संघाच्या सिन्नर तालुका गटातून प्रतिष्ठेच्या लढतीत त्यांनी आमदार कोकाटे यांच्या उमेदवाराचा एकमताने पराभव केला होता. ग्रामपंचायत निवडणुकीत देखील भारत कोकाटे यांनी मंत्री कोकाटे यांच्या पॅनलला आव्हान दिले होते. विविध कार्यकारी सोसायटीच्या गटात मंत्री कोकाटे यांनी सत्तेचा गैरवापर करीत सत्ता संपादन केल्याचा आरोप भारत कोकाटे यांनी केला होता.

त्या पार्श्वभूमीवर गेले काही दिवस मंत्री कोकाटे यांना घरातूनच राजकीय विरोध होऊ लागला आहे. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते आमदार झाले आणि मंत्री देखील झाले. आता जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यात पुन्हा एकदा भाऊबंदकीचा राजकीय अडसर त्यांच्या मार्गात निर्माण झाल्याने तो चर्चेचा विषय आहे.

भारत कोकाटे यांनी आता उद्धव ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात ते प्रवेश करणार आहे. प्रवेशाचा राजकीय अर्थ आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत शिंदे पक्षाकडून पुरेपूर बळ आणि आर्थिक रसद मिळवून कोकाटे यांना आव्हान देणे हेच आहे.

मंत्री कोकाटे यांना आपली कन्या सीमांतिनी कोकाटे हिचे राजकीय पुनर्वसन करायचे आहे. यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुक त्यासाठी महत्त्वाची आहे. सोमठाणे या घरच्या गटातून सीमांतिनी कोकाटे या उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. आता त्यांची लढत भेट भारत कोकाटे यांच्याशी असेल. मंत्री कोकाटे यांची प्रतिष्ठा आणि सीमांतिनी कोकाटे यांचे राजकीय भवितव्य दोन्हीही या निमित्ताने पणाला लागणार आहे.

सिन्नरच्या राजकारणात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काय राजकीय कल असेल याची प्रचिती या निमित्ताने आली आहे. मंत्री कोकाटे यांच्या विरोधात उदय सांगळे यांनी जोरदार तयारी केली आहे. खासदार राजाभाऊ वाजे यांचा गट नेमकी काय भूमिका घेणार याबाबत भिन्न मतप्रवाह आहेत त्यामुळे भारत कोकाटे यांचा शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचा प्रवेश आगामी काळात सिन्नरचे राजकारण ढवळून काढण्यास कारणीभूत ठरणार आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com