Mahavikas Aghadi News: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी रमी खेळण्याबाबत खुलासा केला आहे. मात्र त्यानंतरही विरोधक शांत होण्याची चिन्हे नाहीत. विकासाघाडीने कृषिमंत्री कोकाटे यांच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलन सुरूच ठेवले आहे.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा यासाठी अंमळनेर येथे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले. वेळी उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर तहसीलदार कार्यालयाच्या आवारातच या कार्यकर्त्यांनी पत्ते खेळून कृषीमंत्र्यांचा निषेध केला
अमळनेर शहरातील बळीराजा चौकात देखील महाविकास आघाडीचे नेत्यांनी आंदोलन केले. यावेळी माजी आमदार डॉ बी एस पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी पत्ते उधळत मंत्री कोकाटे यांचा निषेध केला.
"राजा, राणी, एक्का, माणिकराव कोकाटे कृषी मंत्री पदावरून घालवा पक्का", "विधानसभेत खेळतो बदाम सात माणिकराव कोकाटे यांनी केला शेतकऱ्यांचा घात"अशा शेलक्या घोषणा देत आंदोलकांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास मंत्र्यांना वेळ नाही, असा आरोप विरोधकांनी केला.
राज्यात शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. याकडे महायुती सरकार कोणतेही लक्ष द्यायला तयार नाही. शेतकऱ्यांच्या समस्यांवर होणारे आंदोलन राज्य सरकारला गंभीर वाटत नाही. सत्तेवर येण्याआधी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह अनेक घोषणा महायुतीच्या नेत्यांनी केल्या होत्या. आता सत्तेत आल्यावर त्यांना त्याचा विसर पडला आहे.
राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर बनले आहे. अनेक भागात दुष्काळ सदृश्य स्थिती तर काही ठिकाणी बेमौसमी पावसाने शेतीचे नुकसान झाले आहे शेतमालाला भाव मिळत नाही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन देऊनही शासनाने त्याचे पालन केले नाही. अशी स्थिती असताना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे मात्र निर्धास्तपणे विधिमंडळाच्या सभागृहात पत्ते खेळतात हे अतिशय लाजिरवाणे चित्र असल्याचे माजी आमदार डॉ. पाटील यांनी यावेळी सांगितले.
ज्येष्ठ नेते प्राध्यापक सुभाष पाटील प्राध्यापक अशोक पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे नेते डी एम पाटील काँग्रेसचे नेते बी के सूर्यवंशी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते चंद्रशेखर भावसार यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी यावेळी आंदोलनात सहभागी झाले होते. नेत्यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महायुती सरकारने तातडीने लक्ष घालावे. अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी दिला.
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.