Manikrao Kokate news: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना शासकीय सदनिका प्रकरणी दोषी ठरविण्यात आले होते. या खटल्यात बनावट कागदपत्र सादर केल्याने दोन वर्ष शिक्षा ठोकवण्यात आली होती. त्यामुळे कृषिमंत्री कोकाटे यांचे मंत्रीपद आणि विधिमंडळ सदस्यत्व दोन्ही संकटात होते.
आज या संदर्भात नाशिक येथील वरिष्ठ जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली. यामध्ये कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना यापूर्वी सुनावण्यात आलेली दोन वर्षे शिक्षा आणि पन्नास हजाराचा दंड याबाबत स्थगिती देण्यासाठी कृषिमंत्री कोकाटे यांच्या वतीने अपील करण्यात आले होते. त्यावरील सुनावणी झाली. त्यात शिक्षेला स्थगिती देण्यात आली.
यापूर्वी न्यायालयाने सुनावलेल्या निकालाला स्थगिती देण्यात आली होती. मात्र लोकप्रतिनिधी कायद्यान्वये दोन वर्ष अथवा त्याहून अधिक शिक्षा झाल्यास सदस्यत्व रद्द होते. त्यामुळे शिक्षेला स्थगिती मिळणे आवश्यक होते. त्यानुसार आज नाशिकच्या जिल्हा वरिष्ठ स्तर न्यायाधीश जीवने यांच्या न्यायालयात सुनावणी झाली.
न्यायालयाने दोन वर्ष शिक्षेला स्थगिती दिली आहे. या स्थगितीमुळे कृषिमंत्री कोकाटे यांचे मंत्रिपद आणि विधीमंडळ सदस्यत्व दोन्हीनाही जीवदान मिळाले आहे. कृषिमंत्री कोकाटे यांच्या बरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षालाही हा मोठा दिलासा मानला जातो.
महायुतीचा घटक पक्ष असलेल्या कृषिमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना बीड येथील सरपंच हत्याप्रकरणी राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर दुसऱ्या मंत्र्यांवरही कारवाईची लटकती तलवार होती. यामध्ये पक्षालाही अडचणींचा सामना करावा लागला असता. या पार्श्वभूमीवर आजच्या निकालाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षालाही दिलासा मिळाला आहे.
विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने पहिल्याच दिवशी या दोन्ही विषयांवर विरोधकांनी कृषिमंत्री कोकाटे आणि नागरिक पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना टीकेचे लक्ष्य केले होते. यावर मुख्यमंत्र्यांनाही बचावात्मक भूमिका घ्यावी लागली होती. आजच्या निकालाने या सगळ्यांनाच मोठा दिलासा मिळाला आहे.
-----
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.