Raksha khadse Politics: मुक्ताईनगर विनयभंग आणि मस्साजोग हत्या प्रकरणात ‘हे’ आहे धक्कादायक साम्य!

Raksha Khadse;The police did not arrest the state minister, who has the upper hand over these policemen?-मुक्ताईनगर मुलींच्या छेडछाड प्रकरणात पोलिसांनी केंद्रीय राज्यमंत्र्यांनाही गांभिर्याने घेतले नाही, दाखवली अक्षम्य उदासीनता.
Raksha Khadse
Raksha KhadseSarkarnama
Published on
Updated on

Raksha Khadse News: मस्साजोग (बीड) सरपंच संतोष देशमुख आणि मुक्ताईनगर येथील राज्यमंत्री रक्षक खडसे यांच्या मुलीच्या विनयभंग प्रकरणात एक साम्य आढळले आहे. दोन्ही प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल असूनही केवळ चौकशी करून आरोपींना सोडले. त्यामुळे पोलिसांनी हे जाणीवपूर्वक केले की, राजकीय दबावातून याची चर्चा सुरू आहे.

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची कन्या आणि अन्य काही अल्पवयीन मुलींचा विनयभंग करण्यात आला. या मुलींचे व्हिडिओ काढण्यात आले. राजकीय वरदहस्त असलेल्या आणि याबाबत सराईत अशी प्रतिमा असलेल्या कार्यकर्त्यांनी हे केले. त्याबाबत संताप जनक प्रकार पोलिसांकडूनही घडल्याचे पुढे आले आहे.

Raksha Khadse
Satyajeet Tambe Politics: नाशिक पुणे रेल्वे साठी सर्वपक्षीय नेते पुकारणार एल्गार, प्रश्न फडणवीसांच्या दरबारी!

या प्रकरणातील आरोपींना राजकीय वरदहस्त आहे. हे लपून राहिलेले नाही. सत्ताधारी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे हे सर्व पदाधिकारी होते. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री देखील याच पक्षाचे गुलाबराव पाटील आहेत. त्यामुळे देखील या प्रकरणांची राजकीय चर्चा सुरू आहे.

Raksha Khadse
Nashik Pune semi high-speed rail : 'नाशिक-पुणे सेमी हायस्पीड' रेल्वे मार्गाबाबतच्या सर्वपक्षीय कृती समितीत प्रकल्पाचे प्रवर्तक शिवाजीराव आढळराव पाटीलच नाही!

हा राजकीय योगायोग की पडद्यामागून सूत्रे हलल्याने पोलीस हातावर हात धरून बसले. हा गंभीर प्रश्न आहे. या संदर्भात घटना घडली असता पोलीस शिपाई मनोज चोपडे याने तातडीने आरोपींना हटकले होते. त्यावेळी या आरोपींनी चक्क पोलिसांची झटापट केली होती. सार्वजनिक ठिकाणी शालेय विद्यार्थिनींचा विनयभंग होतो. त्यात पोलीस हतबल असल्याचा संदेश गावात जातो. यातून गुन्हेगारांचे मनोबल वाढण्याचे शक्यता आहे.

याबाबतच्या सर्व घटनाक्रम पोलीस शिपाई मनोज चोपडे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र चाटे यांना सांगितला. याबाबत गुन्हा रजिस्टर क्रमांक ६० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र पोलीस निरीक्षक चाटे यांनी कुठलीही कारवाई केली नाही. याबाबत विचारणा झाली असता, वरिष्ठांना कळविले होते. अशी त्रोटक माहिती दिली. गुन्हा दाखल झाल्यावर आरोपींची केवळ चौकशी करून सोडून देणे हे नियमात बसते का? असा प्रश्न निर्माण होतो.

मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नागेश मोहिते यांनीही याच चुकीची पुनरावृत्ती केली. याबाबत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी स्वतः दूरध्वनी वरून त्यांना माहिती दिली होती मात्र त्यांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला नाही. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय राज्यमंत्र्यांनाही जुमानले नाही असा संदेश जातो.

पोलिसात गुन्हा दाखल झाल्यावर संबंधित संशयीतांना ताब्यात घेतले जाते. त्यांच्या कारवाई केली जाते. याबाबत संबळ पुरावे आणि जबाब उपलब्ध असताना पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना मोकळे रान दिले, याचे कारण ते सर्व सत्ताधारी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे सदस्य होते, म्हणून तर हे घडले नाही ना, अशी चर्चा आहे.

मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातही पोलिसांकडून अशीच हेळसांड झाली होती. गुन्हा दाखल करण्यासाठी प्रचंड विलंब करण्यात आला. आरोपी समोर असताना त्यांना अटक करण्याऐवजी मोकळे सोडण्यात आले होते. अशीच स्थिती मुक्ताईनगर प्रकरणातही झाली. त्यामुळे राज्यातील सबंध पोलीस यंत्रणात ढिसाळ झाली आहे की, काय असा प्रश्न पडतो. पोलिसांचा वचक कमी होऊ लागला आहे की, पोलीस दबावात आहे?.याचे उत्तर शोधण्याची वेळ आली आहे.

------

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com