Manikrao Kokate Politics: शिक्षा झाली कृषिमंत्री कोकाटे यांना, आनंद मात्र भुजबळ समर्थकांना, काय आहे कारण?

Manikrao Kokate; Kokate at political backfoot in Guardian minister race-कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने शिक्षा सुनावल्याने त्यांचे राजकीय भवितव्य अस्थिर झाले आहे.
Chhagan Bhujbal & Manikrao  Kokate
Chhagan Bhujbal & Manikrao KokateSarkarnama
Published on
Updated on

Manikrao Kokate News: शासकीय सदनिका घेण्यासाठी बनावट कागदपत्र तयार करण्यात आले. या आरोपाखाली कृषिमंत्री कोकाटे यांना दोन वर्षाचे शिक्षा ठोकवण्यात आली आहे. त्याचे राजकीय पडसाद जिल्ह्यात उमटले आहेत.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना शिक्षा झाली. या बातमीची समाज माध्यमांवर जोरदार चर्चा झाली. या बातम्यांवर तेवढ्याच तीव्रतेने नेटकऱ्यांनी समर्थन आणि टिका करणाऱ्या प्रतिक्रिया देखील नोंदविल्या आहेत.

Chhagan Bhujbal & Manikrao  Kokate
Dr. Shobha Bacchav Politics: खासदार शोभा बच्छाव यांनी दिले किरीट सोमय्या यांना खुले आव्हान!

गेली वीस वर्ष राज्य मंत्रिमंडळात असलेल्या माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना यंदा वगळण्यात आले. नाशिक मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाने भुजबळ यांच्या ऐवजी माणिकराव कोकाटे यांना स्थान दिले होते. त्यामुळे कोकाटे आणि भुजबळ यांच्या समर्थकांत राजकीय शरसंधान अद्यापही सुरू आहे.

Chhagan Bhujbal & Manikrao  Kokate
Manikrao Kokate Politics: माणिकराव कोकाटे यांचे मंत्रीपद थोडक्यात वाचले, ‘हे’आहे कारण!

त्याची तीव्र प्रतिक्रिया समाज माध्यमांवर पाहायला मिळाली. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ समर्थकांनी न्यायालयाच्या निकालानंतर कृषिमंत्री कोकाटे यांच्यावर टीकेची झोड उठवली. भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याचा राग त्यांनी कृषिमंत्री कोकाटे यांच्यावर काढला.

व्हाट्सअप आणि फेसबुक वर भुजबळ समर्थकांच्या विविध पोस्ट अतिशय बोलक्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे धनंजय मुंडे यांच्यानंतर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे अडचणीत आले आहेत. यानिमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर या मंत्र्यांचा राजीनामा घेण्यासाठी दबाव वाढणार आहे.

या मंत्र्यांना वगळल्यास रिक्त होणाऱ्या जागेवर छगन भुजबळ यांची नियुक्ती होऊ शकते, असे त्यांच्या समर्थकांना वाटते. राज्यातील सध्याची स्थिती देखील तशीच आहे. याबाबत अनेकदा माजी मंत्री भुजबळ यांना देखील विचारणा झाली होती. माजी मंत्री भुजबळ यांनी मात्र त्याला नकार दिला असला तरी, सध्याची राजकीय स्थिती त्याकडे अंगुली निर्देश करत आहे.

कृषिमंत्री कोकाटे यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. त्यामुळे त्यांना आता वरिष्ठ न्यायालयात त्या विरोधात दाद मागावी लागणार आहे. आगामी काळात या न्यायालयीन खटल्यात त्यांना गांभीर्याने लक्ष घालावे लागेल. त्यात कृषिमंत्री कोकाटे यांचे आक्रमक राजकारण आता बचावात्मक होईल. त्याचा फायदा घेण्यासाठी त्यांचे विरोधक सरसावले आहेत.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com