Dr. Shobha Bacchav Politics: खासदार शोभा बच्छाव यांनी दिले किरीट सोमय्या यांना खुले आव्हान!

Dr. Shobha Bacchav: BJP has drop Kirit Somaiya to scare peoples and misslead-भारतीय जनता पक्षाने सामान्य जनतेला घाबरवण्यासाठी किरीट सोमय्या यांना मोकळे सोडले आहे.
Dr Shobha Bacchav & Kirit Sommaiya
Dr Shobha Bacchav & Kirit SommaiyaSarkarnama
Published on
Updated on

BJP Vs Congress News: भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांना काँग्रेसच्या खासदार डॉ शोभा बच्छाव यांनी आव्हान दिले आहे. मालेगाव शहरात बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लिम असल्याचा अपप्रचार सोमय्या करतात. या विषयावर आता काँग्रेसही मैदानात उतरली आहे.

भाजपनेते किरीट सोमय्या यांनी गेल्या महिन्यात तीन ते चार वेळा मालेगावचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी सातत्याने मालेगाव शहरातून बनावट जन्म दाखले दिले जात असल्याचा दावा केला होता. त्याचा संबंध त्यांनी बांगलादेशी नागरिक आणि रोहिंग्या मुस्लिम यांच्याशी जोडला होता. त्यामुळे हे प्रकरण संवेदनशील झाले होते.

Dr Shobha Bacchav & Kirit Sommaiya
Manikrao Kokate Politics: माणिकराव कोकाटे यांचे मंत्रीपद थोडक्यात वाचले, ‘हे’आहे कारण!

राज्य शासनाने त्यासाठी विशेष तपास पथक नियुक्त केले आहे. या पथकाकडून मालेगाव शहरात तीन हजारांहून अधिक नागरिकांना नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीस मुळे कायद्याची फारशी माहिती नसलेले आणि अल्पशिक्षित महिला व नागरिक चांगलेच घाबरून गेले आहेत. त्याबाबत काँग्रेसच्या खासदार डॉ. बच्छाव यांनी लक्ष घातले आहे.

Dr Shobha Bacchav & Kirit Sommaiya
Manikrao Kokate : थेट कृषी मंत्र्यांना धक्का देणारे तुकाराम दिघोळे कोण होते?

माजी खासदार सोमय्या यांचा काँग्रेसच्या खासदार डॉ. बच्छाव यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ‘एसआयटी’ने आपला तपास शांततेने केला पाहिजे. त्यांच्या तपासामुळे मालेगाव शहरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, हे अतिशय अयोग्य आहे. ‘एसआयटी’ पथकाने केलेली कार्यवाही ही केवळ तपासणी आहे. नागरिकांविरुद्ध गैरविश्वास किंवा शासकीय कारवाई नाही. तो शासकीय प्रक्रियेचा एक भाग आहे. मात्र तरीही नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण होत आहे.

त्यामुळे चौकशी करताना प्रामाणिक नागरिकांना त्रास होणार नाही. याची दक्षता ‘एसआयटी’ पथकाने केली पाहिजे. ‘एसआयटी’ने तपास करावा मात्र नागरिकांमध्ये भीती निर्माण होईल, असे वातावरण करू नये. भारतीय जनता पक्ष मालेगावच्या नागरिकांशी सूडबुद्धीने वागत आहे. त्यासाठी त्यांनी किरीट सोमय्या यांना वातावरण निर्मितीसाठी सोडले आहे. किरीट सोमय्या सातत्याने खोटे आरोप करून मालेगावला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात.

माजी खासदार सोमय्या यांनी सातत्याने बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लिम यांना कागदपत्र दिल्याचे आरोप केले होते. मात्र यातील एकही आरोप सिद्ध झाला नाही. यानिमित्ताने शहरात राजकारण मात्र जोरात सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या डॉ बच्छाव यांनी भाजपच्या सोमय्या यांना आता आव्हान दिल्याने आगामी काळात हे राजकारण आणखी टोकदार होण्याची चिन्हे आहेत.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com