Manikrao Kokate Politics: आमदार कोकाटे म्हणतात, "मला निवडणुकीत प्रतिस्पर्धीच नाही"

MLA Kokate Confident in Election: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे माझ्या विरोधात लढण्यासाठी उमेदवारच नसल्याने उमेदवार आयात करावा लागला.
Manikrao Kokate
Manikrao KokateSarkarnama
Published on
Updated on

NCP Vs NCP News: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून सिन्नर विधानसभा मतदारसंघात आमदार माणिकराव कोकाटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष उमेदवार देणार आहे. त्यामुळे सिन्नर मतदारसंघाची निवडणूक रंगतदार होईल.

आमदार माणिकराव कोकाटे लवकरच आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महायुतीच्या स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करीत ते आपल्या अर्ज दाखल करतील. या निवडणुकीविषयी ते निश्चिंत आहेत असे दिसते.

यासंदर्भात आमदार कोकाटे यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे माझ्या विरोधात उमेदवारच नाही. सिन्नर मतदारसंघात प्रयत्न करूनही त्यांना मला आव्हान देता येईल, असा उमेदवार सापडला नाही.

त्यामुळे इतर पंधरा-सोळा इच्छुकांमध्ये योग्य उमेदवार नसल्याने त्यांना बाहेरून उमेदवार आयात करावा लागला आहे. यातच सर्व काही आले. त्यामुळे मला या निवडणुकीत आव्हान कोण देणार? हे मला सुद्धा पहायचे आहे.

Manikrao Kokate
Ajit Pawar Politics: अजित पवारांसोबत पहिल्या गाडीने गेलेल्या दिलीप बनकर यांच्या उमेदवारीचा सस्पेन्स वाढला!

आमदार कोकाटे म्हणाले, येत्या निवडणुकीत मला कोणाचेही आव्हान नाही. मी विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरे जात आहे. गेल्या पाच वर्षात मी केलेल्या कामांवर मतदारसंघातील जनता समाधानी आहे. ते येत्या निवडणुकीच्या निमित्ताने सगळ्यांना दिसेल.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार पडल्यानंतर राज्यात विविध घडामोडी घडल्या. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. या फुटीचा विधानसभा निवडणुकीवर काहीही परिणाम होणार नाही. मतदारांमध्ये फिरताना त्याची जाणीव होते, असे आमदार कोकाटे म्हणाले.

ज्येष्ठ नेते शरद पवार विधानसभा निवडणुकीत आघाडीचे नेतृत्व करीत आहेत. मात्र ते विधानसभेत नाहीत. त्यामुळे आमदारांचा किंवा मतदारसंघाचा काही प्रश्न अडला तर काय करायचे? त्यामुळे विधानसभेत नेतृत्व करणाऱ्या नेत्याच्या पक्षालाच मतदान करणे योग्य असेल. आमदार त्या नेत्याकडे आपल्या अडचणी मांडू शकतील. मतदारसंघाचे प्रश्न पोहोचवू शकतील.

Manikrao Kokate
Ajit Pawar Politics: अजित पवारांसोबत पहिल्या गाडीने गेलेल्या दिलीप बनकर यांच्या उमेदवारीचा सस्पेन्स वाढला!

यापूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार केंद्रात असायचे. अजित पवार राज्यात असायचे. त्यामुळे कोणताही प्रश्न अडला समस्या निर्माण झाल्या तर त्यावर राज्यात आणि केंद्रात दोन्हीकडे दाद मागता येत होती. प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता होती. आता तसे राहिलेले नाही, असा दावा आमदार कोकाटे यांनी केला.

सिन्नर विधानसभा मतदारसंघात खासदार राजाभाऊ वाजे यांना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विक्रमी मताधिक्य मिळाले होते. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत काय चित्र असेल? यात खासदार वाजे यांचे प्रतिष्ठा जोडली गेली आहे. या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत तटस्थ राहिलेल्या उदय सांगळे यांनी अपक्ष उमेदवारी करण्याची तयारी केली होती.

उदय सांगळे यांचा मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश झाला आहे. ते आता सिन्नर मतदारसंघातून शरद पवार यांची तुतारी हाती घेणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार कोकाटे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सांगणे यांच्यात लढत होणार आहे. या लढतीकडे अनेकांचे लक्ष लागले असून महाविकास आघाडीत कसा समन्वय निर्माण होतो, याची उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com