Ajit Pawar Politics: अजित पवारांसोबत पहिल्या गाडीने गेलेल्या दिलीप बनकर यांच्या उमेदवारीचा सस्पेन्स वाढला!

Dilip Bankar Candidacy Suspense with Ajit Pawar: यतीन कदम यांनी केला आमदार दिलीप बनकर यांच्या उमेदवारीला अपशकुन.
Yatin Kadam, Ajit Pawar & Dilip Bankar
Yatin Kadam, Ajit Pawar & Dilip BankarSarkarnama
Published on
Updated on

Dilip Bankar News: निफाड विधानसभा मतदार संघाच्या उमेदवारी बाबतचा सस्पेन्स वाढत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून आमदार दिलीप बनकर यांच्याबाबत काय निर्णय घेतला जातो, याची उत्सुकता सतत वाढत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड झाल्यावर निफाडचे आमदार अनपेक्षित रित्या पहिल्याच गाडीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेले होते. निफाड मतदारसंघ ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विचारांचा मानला जातो. त्यामुळे आमदार बनकर यांचे बंड एक राजकीय धाडस होते.

असे असले तरीही आमदार बनकर यांच्या उमेदवारीची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या पहिल्या यादीत झालेली नाही. आमदार बनकर यांच्या उमेदवारीबाबत दिवसेंदिवस सस्पेन्स वाढत आहे. त्याला कारणही तसेच घडले आहे.

गेल्या निवडणुकीत यतीन कदम यांनी अपक्ष उमेदवारी करून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बनकर यांच्या विजयाला हातभार लावला होता. त्याच यतीन कदम यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे उमेदवारी मागितली आहे.

Yatin Kadam, Ajit Pawar & Dilip Bankar
Sanjay Raut: शिवसेनेचे शिष्टमंडळ शरद पवारांच्या भेटीला; उमेदवारीसाठी योगेश घोलप यांचा धरला आग्रह!

यातीन कदम हे ओझर परिसरात प्रभाव असलेले भाजपचे पदाधिकारी आहेत. माजी आमदार (कै) रावसाहेब कदम आणि शिवसेनेच्या माजी आमदार मंदाकिनी कदम यांचे ते चिरंजीव आहेत. हा राजकीय वारसा असल्याने त्यांच्या उमेदवारीला वरिष्ठ नेते गांभीर्याने घेतात.

त्याचाच फटका आमदार बनकर यांना बसला आहे. आमदार बनकर यांच्या उमेदवारीला यतीन कदम यांनी अपशकून केला आहे. त्यामुळे निफाड मतदारसंघातील बनकर समर्थकांमध्ये अस्वस्थता वाढत आहे.

यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयात निफाड मतदारसंघाच्या उमेदवारीचा तिढा सोडविण्यासाठी चर्चा झाली. यावेळी माजी आमदार मंदाकिनी कदम, यतीन कदम आणि आमदार दिलीप बनकर हे तिघेही उपस्थित होते.

Yatin Kadam, Ajit Pawar & Dilip Bankar
Shivsena UBT Politics: नाशिक मध्य शिवसेना ठाकरे पक्षाला?, वसंत गिते महाविकास आघाडीचे उमेदवार? आज होणार घोषणा!

यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी दिलीप बनकर आणि यतीन कदम यांनी परस्परांत चर्चा करून उमेदवारीचा निर्णय कळवावा. त्याला पक्षाचे समर्थन असेल, असे सांगितले. यामध्ये कोणाला उमेदवारी मिळणार याचा सस्पेन्स उपमुख्यमंत्री पवार यांनी आणखी वाढवला.

आमदार बनकर हे उपमुख्यमंत्री पवार यांच्यासोबत बंडात सहभागी झालेले विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे त्यांना नैसर्गिक न्यायाने उमेदवारी अपेक्षित होती. मात्र उमेदवारीची घोषणा सतत लांबणीवर पडत आहे. त्यामुळे आमदार बनकर हे देखील अस्वस्थ झाले आहे.

आमदार बनकर यांच्या विषयी ते आक्रमक नाहीत. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार माजी आमदार अनिल कदम यांना आव्हान देऊ शकणार नाही. सध्या निफाड मतदारसंघात राजकीय परिस्थिती आणि निवडणुकीतील वातावरण महायुतीला फारसे अनुकूल नाही. त्यामुळे आपल्यालाच उमेदवारी द्यावी, असा आग्रह यतीन कदम यांनी धरला आहे. उपमुख्यमंत्री पवार त्याला बळी पडतात की, यतीन कदम यांना कात्रज चा घाट दाखवतात. हे लवकरच स्पष्ट होईल.

एकंदरच निफाडच्या निवडणुकीच्या राजकारणात यतीन कदम फॅक्टर अचानकपणे चर्चेत आला आहे. त्याची राजकीय कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनाही अपेक्षा नव्हती. अशा स्थितीत निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. तरीही उमेदवारी जाहीर न झाल्याने आमदार बनकर यांचे टेन्शन चांगलेच वाढले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com