Manikrao Kokate Politics: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची अस्वस्थता कायम, शिक्षेला स्थगिती नाहीच!

Manikrao kokate; The court reserved its verdict, Kokate's unease continues-नाशिकच्या सत्र न्यायालयाने कृषिमंत्री कोकाटे यांच्या याची केवळ निर्णय दिला नाही.
Manikrao Kokate
Manikrao KokateSarkarnama
Published on
Updated on

Manikrao Kokate News: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना शासकीय सदनिका घोटाळा प्रकरणी शिक्षा झाली आहे. त्यांना दोन वर्षाची शिक्षा झाल्याने त्यांच्या विधिमंडळ सदस्यत्वाबाबत पेच आहे. याबाबत न्यायालयात आजही निकाल होऊ शकला नाही.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेविरोधात कोकाटे यांनी सोमवारी वरिष्ठ न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने त्यांना सुनावणी पूर्ण होईपर्यंत जामीन मंजूर केला आहे.

Manikrao Kokate
Maharashtra Politics: अजित दादांनी नाड्या आवळल्या ; मंत्री अस्वस्थ, कामे ठप्प, कंत्राटदार रस्त्यावर...

कृषिमंत्री कोकाटे यांना आपले विधिमंडळाचे सदस्यत्व आणि मंत्रीपद कायम ठेवण्यासाठी या शिक्षेला स्थगिती मिळवणे क्रमप्राप्त आहे. त्यानुसार काल नाशिकच्या न्यायालयात याबाबत याचिका दाखल झाली होती. त्याची सुनावणी आज अपेक्षित होती.

Manikrao Kokate
Dr. Anand Pawar: जिल्हा रुग्णालय वाद, तक्रार करणारा डॉक्टरच निघाला चक्क खंडणीखोर!

न्यायालयाने आज या याचिकेवर सुनावणी घेतली. यावेळी सरकारी वकील यांनी आपली भूमिका मांडत स्थगितीला विरोध दर्शविला. त्यानंतर कृषिमंत्री कोकाटे यांच्या वकिलांनी देखील शिक्षेला स्थगितीची मागणी केली. मात्र न्यायालयाने कोणताही निकाल न देता येत्या एक मार्चला पुढील सुनावणी होईल असे सांगितले.

कृषिमंत्री कोकाटे यांच्या शिक्षेला अद्याप स्थगिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे पुढील सुनावणी पर्यंत कृषिमंत्री कोकाटे यांची अस्वस्थता कायम असणार आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून सभापतींवर कारवाईसाठी दबाव वाढविला जाण्याची शक्यता आहे.

महायुतीच्या सध्याच्या मंत्रिमंडळात शिक्षा झालेले श्री कोकाटे हे पहिलेच मंत्री आहेत. त्यामुळे महायुती पुढे राजकीय पेच वाढण्याची शक्यता आहे. विरोधकांकडून या संधीचा लाभ उठविण्यासाठी मंत्री कोकाटे यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com