Manikrao Kokate politics: आश्चर्य, न्यायालयाला चिंता खर्चाची! मंत्री कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देताना वकिलांनी केलेली टिपण्णी चर्चेत

Manikrao kokate;'This' issue is under discussion in court while suspending Minister Kokate's sentence-न्यायालयापुढे बचाव, शिक्षेला स्थगिती न दिल्यास फेर निवडणुकीसाठी मोठा खर्च झाला असता...
Manikrao Kokate
Manikrao KokateSarkarnama
Published on
Updated on

Manikrao Kokate News: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे सदनिका घेतली. या संदर्भात नाशिकच्या न्यायालयाने त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेला वरिष्ठ न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिकच्या न्यायालयाने दोन वर्षे शिक्षा सुनावली आहे. दोन वर्ष अथवा त्याहून अधिक शिक्षा झाल्यास लोकप्रतिनिधित्व कायद्यान्वये संबंधितांचे पद रद्द होते. त्यामुळे या शिक्षणे कृषिमंत्री कोकाटे यांचे विधानसभा सदस्यत्व आणि पर्यायाने मंत्रीपद ही बरखास्त झाले असते. त्यामुळे या शिक्षेला विशेष अर्थ प्राप्त होता.

या संदर्भात कृषिमंत्री कोकाटे यांच्या वतीने ॲड. अविनाश भिडे यांनी नाशिकच्या वरिष्ठ न्यायालयात अपील केले होते. त्यात न्यायालयाने कृषिमंत्री कोकाटे यांच्या दोन वर्षे शिक्षेला स्थगिती दिली आहे. ही स्थगिती देताना लोकप्रतिनिधित्व कायद्याचा विशेष उल्लेख आणि आधार घेण्यात आला आहे.

Manikrao Kokate
Vote jihad Politics: आसिफ शेख यांचा धक्कादायक दावा, ‘होय, निवडणुकीसाठी मालेगावात बाहेरून पैसे आले’

या संदर्भात ॲड. भिडे यांनी सांगितले की, न्यायालयापुढे विविध मुद्दे सादर करण्यात आले. त्यात सिन्नर मतदार संघातील जनतेने चार ते पाच वेळा श्री कोकाटे यांना विजयी केले आहे. यंदा ते कॅबिनेट मंत्री म्हणून राज्याचा कारभार पाहत आहेत. अशा स्थितीत त्यांच्या शिक्षेला स्थगिती न मिळाल्यास त्यांची ही पदे रद्द होतील. या निमित्ताने त्यांना मिळालेली ही संधी हिरावली जाऊ शकते, असे आम्ही निर्दशनास आणून दिले.

शिक्षण स्थगिती दिल्यास सरकारचे कोणतेही नुकसान होणार नाही. आमदारकी रद्द झाल्यास फेर निवडणूक घ्यावी लागेल. आजच्या परिस्थितीत त्यावर मोठा खर्च होईल. त्यामुळे या शिक्षेला स्थगिती देण्यासाठी तो एक महत्त्वाचा मुद्दा ठरला.

न्यायालयाकडून अपवादात्मक स्थितीतच शिक्षेला स्थगिती देण्याचा प्रघात आहे. त्यासाठी उच्च न्यायालय आणि अन्य विविध खटल्यांचा संदर्भ न्यायालयापुढे सादर करण्यात आला. श्री कोकाटे यांनी सदनिका घेण्यासाठी १९८९ मध्ये अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने उत्पन्नाचा संदर्भ तपासताना १९९२ पुढील कालावधीचा विचार केला आहे, असेही न्यायालयापुढे सांगण्यात आले.

श्री कोकाटे यांच्या शिक्षेवरील स्थगितीच्या अपीलात अनेक मुद्दे मांडण्यात आले आहेत. त्यामध्ये लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना गुजरात न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षकाही संदर्भ देण्यात आला आहे. राहुल गांधी आणि श्री कोकाटे यांच्या प्रकरणात मोठा फरक आहे. तोही संदर्भ न्यायालयाकडे सादर करण्यात आला, असे ॲड. भिडे यांनी सांगितले.

------

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com