Vote jihad Politics: आसिफ शेख यांचा धक्कादायक दावा, ‘होय, निवडणुकीसाठी मालेगावात बाहेरून पैसे आले’

Asif Sheikh; Asif Shaikh Jump in Vote jihad case of Malegaon, made big claim-आमदार मौलाना मुफ्ती यांचे कट्टर विरोधक माजी आमदार असिफ शेख आणि किरीट सोमय्या यांच्या मदतीला धावले.
Maulana Mufti Ismail & Asif Shaikh.jpg
Maulana Mufti Ismail & Asif Shaikh.jpgSarkarnama
Published on
Updated on

Vote Jihad News: मालेगावच्या व्होट जिहाद प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाशी जवळीक असलेल्या माजी आमदार आसिफ शेख यांनी या प्रकरणात उडी घेतली आहे. यानिमित्ताने आमदार मौलाना मुफ्ती यांना त्यांनी लक्ष्य केले आहे.

भाजपने नेते किरीट सोमय्या यांनी निवडणुकीदरम्यान मालेगाव शहरात १२५ कोटी रुपये आल्याचा दावा केला होता. हा पैसा वोट जीहादसाठी होता असा आरोप त्यांनी केला. यावेळी त्यांनी प्रामुख्याने काँग्रेस पक्षाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याला वेगळे वळण मिळाले आहे.

Maulana Mufti Ismail & Asif Shaikh.jpg
Ajit Navale Politics:अजित नवलेंचा महायुतीला दणका, म्हणाले, अर्थसंकल्पात केवळ ठेकेदारी आणि टक्केवारीच!

या प्रकरणात आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाशी जवळीक असलेले माजी आमदार असिफ शेख यांनी उडी घेतली आहे. माजी आमदार शेख हे आमदार मौलाना मुफ्ती यांचे कट्टर विरोधक आहेत. विधानसभा निवडणुकीत मौलाना मुफ्ती यांनी आमदार आसिफ शेख यांचा अवघ्या काही मतांनी पराभूत केले होते. तेव्हापासून त्यांच्यात आरोप, प्रत्यारोप सुरू आहेत.

Maulana Mufti Ismail & Asif Shaikh.jpg
Satyajit Tambe Politics: सत्यजित तांबे यांनी केले फडणवीसांचे कौतुक, विरोधकांच्या भुवया उंचावल्या.

माजी आमदार शेख यांनी विधानसभा आणि लोकसभा या दोन्ही निवडणुकीत मालेगाव शहरात बाहेरून पैसा आला होता, याला दुजोरा दिला आहे. यासंदर्भात आपल्याकडे सर्व प्रकारचे पुरावे उपलब्ध आहेत. गरज वाटल्यास तपास यंत्रणांना आपण हे पुरावे देण्याची तयारी ठेवली आहे, असे सांगून खळबळ उडवून दिली.

या संदर्भात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांची भेट घेणार आहोत. त्यांना व्होट जिहाद संदर्भात आपल्याकडे असलेले पुरावे सादर करू. मालेगावात निवडणुकीसाठी पैसा आला होता, असा धक्कादायक दावा त्यांनी केला. त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच राजकीय वळण लागले आहे.

बाहेरून आलेला हा पैसा विद्यमान आमदारांच्या मदतीसाठी होता, असा दावाही त्यांनी केला. असे सांगतानाच या प्रकरणातून आपली सुटका करण्यासाठी त्यांनी आपल्याकडे मात्र कोणताही पैसा आला नाही. आपल्याला निवडणुकीत पैसा मिळाला नाही, असे स्पष्टीकरण देखील त्यांनी केले.

माजी खासदार सोमय्या यांनी यापूर्वी मालेगाव मर्चंट बँकेत काही युवकांच्या नावाने पैसे आल्याचे जाहीर केले होते. मात्र त्याआधी संबंधित युवकांनीच पोलिसांकडे देखील तक्रार केली होती. एका डाळिंब व्यापाऱ्याकडे त्याबाबत पोलिसांनी चौकशी केली होती. बँकेने देखील याबाबत एका अधिकाऱ्यावर कारवाई केलेली आहे.

आता या संदर्भात माजी आमदार शेख यांनी आपल्या प्रतिस्पर्धींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. व्होट जिहाद या आरोपावर भाजप नेते सोमय्या यांना आसिफ यांच्या आरोपाने अधिक बळ मिळाले आहे. त्यामुळे आगामी काळात हा मुद्दा मालेगावच्या राजकारणात खळबळ उडवून देणार हे स्पष्ट झाले आहे.

------

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com