
Eknath Shinde: महायुतीच्या सरकारमध्ये सध्या अनागोंदी सुरु आहे. प्रत्येकजण आपापल्या खात्यातील वाटा कसा काढता येईल हेच बघतो आहे. गेल्या काह दिवसांत एकामागून एक व्हिडिओ बाहेर येत होते, हे व्हिडिओ कसे बाहेर आले? आम्हाला माहिती नाही. पण यावरुन एकूण असं चित्र दिसतंय की, आता एकनाथ शिंदेंची गरज संपलेली आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी आपली भूमिका मांडली. राज्यात सध्या गाजत असलेल्या कथित हनीट्रॅपच्या प्रकरणावरही त्यांनी भाष्य केलं आहे.
सतेज पाटील म्हणाले, "हनी ट्रॅपची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास जाहीर करावा. महाराष्ट्रातील जनतेच्या शंकेचं निरसन झालं पाहिजे, ही पोलिसांची जबाबदारी आहे. हनी ट्रॅप होता का नव्हता? असेल तर तो कोणी केला? त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. सरकारने याबाबत माहिती लपवून ठेवून राजकीय वापर करु नये. तो बाहेर काढावा अशी आमची अपेक्षा आहे" जनसुरक्षा विधेयकाची आज जिल्हा काँग्रेसकडून होळी करण्यात आली, यावेळी सतेज पाटील बोलत होते.
एकूणच अधिवेशनात आम्ही बघितलं, साधारणपणे काही माहिती, व्हिडीओ बाहेर येत होते. खाजगी घरातला संजय शिरसाटांचा व्हिडीओ कसा बाहेर आला? तो आम्हाला माहिती नाही. तो माध्यमांपर्यत कसा पोहचला? हे आम्हाला माहिती नाही. त्याच्या मागे कोण आहे? हे आम्हाला माहिती नाही. त्याच्यावरुन एकूण असं चित्र दिसतयं, की भाजपला आता एकनाथ शिंदे यांची गरज संपलेली आहे. अशीच एकूण धारणा झालेली आहे. सरकारमध्ये सध्या अनागोंदी सुरू आहे. प्रत्येकजण आपआपल्या खात्यातील वाटा कसा काढता येईल याच्यापलिकडे महाराष्ट्राकडं बघताना दिसत नाही.
जनसुरक्षा विधयेकामध्ये आम्ही काही सूचना सांगितल्या होत्या, त्याची अंमलबजावणी झालेली नाही. विधानपरिषदेमध्ये जेव्हा हे विधयक आलं तेंव्हा डिसेन्ट नोट देऊन जनसुरक्षा विधयक रद्द करण्याची भूमिका आम्ही मांडली. त्यामुळं राज्यपालांना देखील आम्ही महाविकास आघाडी म्हणून भेटलो आणि त्यांच्याकडंही हे विधयक परत पाठवण्याची विनंती केली आहे. या विधेयकावर 12 हजार सूचना, आक्षेप आले आहेत, याची दखल घ्या. लोकांच्या भावना समजून घ्या, अशी मागणी सतेज पाटील यांनी केली.
शेतकऱ्यांचे प्रश्न मांडताना अनेकदा आंदोलनं होतात. छावा संघटनेच्या लोकांनी आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला, भूमिका मांडून बाहेर आल्यानंतर त्यांना माराहण करण्यात आली. बाहेर आल्यानंतर त्यांना मारणं हे किती अमानुष आहे. म्हणजे दहशत पसरवायची, सरकार विरोधात बोलणाऱ्या आम्ही असचं उत्तर देवू हे महाराष्ट्राच्या लोकशाहीत चालणार नाही. यशवंतराव चव्हाणांना अभिप्रेत असणारा महाराष्ट्र असा नव्हता. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना माराहण करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली.
विधानसभेमध्ये भास्कर जाधव यांना विरोधी पक्ष नेता करावं असं महाविकास आघाडीनं सरकारला सुचवला आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी यावर अध्यक्ष योग्यवेळी निर्णय घेतील असं म्हटलं. योग्य वेळ कधी येणार आहे. त्यासाठी आम्ही दाते पंचांग बघायचं की आणखी कुठलं? अंबादास दानवे यांचा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाचा कार्यकाळ संपला असला तरी ते अजून आमदार राहणार आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदावर अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक आमदार आता काँग्रेसचे आहेत त्यामुळे काँग्रेसचा या पदावर क्लेम असेल असा दावा आमदार पाटील यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.