Manjula Gavit Politics: सत्ताधारी आमदार मंजुळा गावित साक्रीच्या पोलिसांवर चांगल्याच भडकल्या, काय आहे प्रकरण?

Manjula Gavit; Eknath Shinde Shivsena MLA Manjula Gavit strips Sakri police of their clothes, harasses criminals -शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या आमदार मंजुळा गावित यांनी साक्री पोलिसांचा थेट विधानसभेतच पंचनामा केला
MLA Manjula Gavit
MLA Manjula GavitSarkarnama
Published on
Updated on

Manjula Gavit News: साक्री मतदारसंघाच्या आमदार मंजुळा गावित काल विधानसभेत चांगल्याच जनता संतापल्या होत्या. त्यांनी आपला संताप साक्री शहराच्या पोलिसांवर काढला. पोलिसांवर यावेळी त्यांनी अतिशय गंभीर आरोप केले. त्यामुळे गृहखात्याचे वाभाडे निघाले.

राज्यातील महायुती सरकारकडे प्रचंड बहुमत आहे. त्यामुळे विरोधी पक्ष अनेकदा सत्ताधाऱ्यांपुढे असहाय दिसतो. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठविण्याचे काम सत्ताधारी पक्षालाच करावे लागते असे चित्र. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या आमदार मंजुळा गावित यांनी जन सुरक्षा विधेयकावरील चर्चेत सोमवारी असेच काहीसे चित्र दिसले.

आमदार गावित यांच्या साक्री मतदारसंघात अवैध व्यवसाय जोमात सुरू आहेत. याबाबत अनेकदा तक्रारी करण्यात आल्या. मात्र पोलिसांकडून कोणतीही कारवाई झाली नाही. तक्रार करणाऱ्यांनाच पोलीस त्रास देतात, असा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला. त्यामुळे साक्री शहराच्या पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आमदारांनी केलेली टिकेची थेट विधानसभेला दखल घ्यावी लागली.

MLA Manjula Gavit
Jalgaon Politics: उत्तर महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; 13 माजी नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश

साक्री शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अमली पदार्थांची विक्री जोमाने सुरू आहे. त्यामुळे युवा पिढी व्यसनाधीन होत आहे. या पिढीला वाचविण्यासाठी कोणतेही प्रयत्न होत नाही. पोलीस याबाबत अमली पदार्थ विक्रेत्यांना संरक्षण देतात, अशी स्थिती आहे, असे आमदार गावी यांनी विधानसभेत सांगितले.

एकीकडे मंजुळा गावित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृह विभागाचे जन सुरक्षा विधेयक आणल्याबद्दल अभिनंदन केले. या विधेयकामुळे व्यसनाधीनता आणि गुन्हेगारीला आळा बसेल, असा दावा त्यांनी केला. हे विधेयक महिलांमध्ये सुरक्षितता निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे ठरेल असे ते म्हणाले.

या विधेयकाच्या माध्यमातून त्यांनी साखरे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेची विदारक स्थिती विधानसभेत मांडली. आमदार गावित यांनी साक्री शहरातील पोलिसांवर गंभीर आरोप केले. शहरात अनाधिकृत मद्य आणि ताडी विक्री जोरात सुरू आहे. मात्र शहरात कुठेही साडीचे झाडे नाही. रसायनांपासून तयार केलेली घातक ताडी विक्री केली जाते.

पोलिसांकडे तक्रार करणाऱ्या नागरिकांची नावे गोपनीय ठेवण्याची पद्धत आहे. विशेषता महिलांनी तक्रार केल्यास त्या तक्रारींची गंभीर दखल घेणे अपेक्षित आहे. मात्र उलट पोलीसच तक्रार करणाऱ्या महिलांची नावे जाहीर करतात, असा गंभीर आरोप आमदार गावीक यांनी केला. त्यांच्या मागणीला सभागृहातही सदस्यांनी पाठिंबा दिला. मात्र या निमित्त गृह विभागाचे वाभाडे निघाले.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com