Nandgaon Politics: आमदार कांदे, भुजबळ यांच्या विरोधात आता नांदगावकरांचा 'देवदूत' मैदानात!

Bhujbal Kande vs Nandgaonkar : नांदगावकरांना यंदा हवा आहे स्थानिक आमदार त्यासाठी मतदार झाले सर्व एकत्र.
Suahas Kande, Dr Rohan Borse & Sameer Bhujbal
Suahas Kande, Dr Rohan Borse & Sameer BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Dr Rohan Borse News: नांदगाव मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात माजी खासदार समीर भुजबळ की गणेश धात्रक अशी चर्चा होती. या सर्वांवर स्थानिक नांदगावकरांनी चक्क पर्यायी उमेदवार म्हणून `देवदूत` उमेदवार शोधला आहे.

नांदगाव मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांना अपक्ष माजी खासदार समीर भुजबळ आव्हान देणार ही शक्यता आहे. ही राजकीय घडामोडी सबंध राज्यासाठी आणि महायुतीसाठी धक्कादायक आहे. आता नांदगावकरांच्या पुढाकाराने डॉ रोहन बोरसे हा स्थानिक फॅक्टर सक्रिय झाला आहे.

माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रवेशाने महायुतीचे गणेश धात्रक यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महायुतीला महाविकास आघाडी उत्तर देण्याच्या स्थितीत होती. मात्र स्थानिक नेते याबाबत फारसे आक्रमक नाहीत. या भावनेतूनच एक गट मराठा महासंघाच्या माध्यमातून सक्रिय झाला आहे.

मराठा महासंघाने त्यासाठी सबंध मतदारसंघात बैठकांचे सत्र सुरू केले आहे. नांदगाव मतदारसंघात महिला रुग्णालय स्थापन करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावलेले आणि या रुग्णालयाचे वैद्यकीय अध्यक्ष डॉक्टर बोरसे या निमित्ताने निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे एक नवा आणि ताजा चेहरा म्हणून ते चर्चेत आहेत.

Suahas Kande, Dr Rohan Borse & Sameer Bhujbal
Snehalata Kolhe News : कोल्हेंच्या मनधरणीसाठी दिल्लीतून प्रयत्न सुरू ; यादव अन् फडणवीसांसमोर आव्हान

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली. त्यानंतर नांदगाव मतदार संघात मतदार आणि कार्यकर्त्यांच्या जोर बैठकांना वेग आला. यामध्ये महाविकास आघाडी आणि तिचा उमेदवार दोन्हीही बॅकफूटवर गेले आहेत.

गेल्या चार दिवसात मालेगाव तालुक्यातील तिन्ही जिल्हा परिषद गटांसह नांदगाव तालुक्यात सर्व मोठ्या गावांमध्ये बैठका झाल्या आहेत. याची निर्णायक बैठक शनिवारी साकोरा येथे झाली. कपिलेश्वर मंदिराच्या सभा मंडपात झालेल्या या बैठकीसाठी मराठा महासंघाने पुढाकार घेतला होता.

गेली १५ वर्ष स्थानिक नागरिकांचा आवाज दडपला जात आहे. दहशत आणि दडपशाहीमुळे प्रामाणिक नागरिक शेतकरी आपले मत देखील व्यक्त करू शकत नाही, अशी मतदारसंघात परिस्थिती निर्माण झाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. त्यासाठी नांदगावकरांचा स्थानिक प्रतिनिधी मैदानात असला पाहिजे असे मत बहुतांशी नागरिकांनी व्यक्त केले.

Suahas Kande, Dr Rohan Borse & Sameer Bhujbal
Nashik Central Constituency: 'नाशिक मध्य'चे संकट; काँग्रेस- शिवसेना आणि भाजप तिन्ही पक्ष प्रचंड चिंतेत?

यावेळी डॉ रोहन बोरसे यांनी या निवडणुकीत उमेदवारी करावी, असा एकमुखी निर्णय झाला. डॉ बोरसे यांनी नांदगावकरांचा स्थानिक उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी वैद्यकीय अधिकारी पदाचा राजीनामा दिला आहे.

डॉ बोरसे हे गेली १५ वर्ष नांदगावच्या विविध ग्रामीण रुग्णालयांमध्ये सेवा करीत आहेत. या कालावधीत त्यांनी असंख्य गरजू आणि गरिबांची सेवा आणि वैद्यकीय उपचार केल्याने ते "देवदूत" म्हणून लोकप्रिय झाले आहेत.

त्यामुळे स्थानिक नागरिकांनी पंधरा वर्षानंतर यंदाच्या निवडणुकीत नांदगावकरांचा आवाज म्हणून स्थानिक कार्यकर्त्यालाच उमेदवारी मिळाली पाहिजे, असा आग्रह धरला आहे. त्यातून डॉ रोहन बोरसे यांची उमेदवारी जवळपास निश्चित करण्यात आली.

यानिमित्ताने गेली दहा वर्षे पंकज भुजबळ आणि गेली पाच वर्षे सुहास कांदे या मतदारसंघाबाहेरच्या उमेदवारांना आता पर्याय निर्माण झाला आहे. या निर्णयाने नांदगावचे राजकारण अचानक वेगळे वळण घेत आहे. अशी स्थिती आहे येत्या एक-दोन दिवसात यासंदर्भात मतदारसंघात स्थानिक विरुद्ध बाहेरचे अशी राजकीय लढता दिसल्यास नवल नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com