Manoj Jarange Politics: शिंदे गटाचे आमदार किशोर दराडे पडले ‘जरांगे फॅक्टर’ च्या मोहात?

Manoj jarange factor; OBCs from Yeola Constituency also want Jarange's blessings-येवला मतदारसंघात मंत्री छगन भुजबळ यांचे विरोधक जरांगे पाटील यांच्या आशेवर?
Manoj Jarange Patil & Chhagan Bhujbal
Manoj Jarange Patil & Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Yeola constituency: राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ येवला मतदारसंघात निवडणुकीची तयारी करीत आहेत. त्यांच्या विरोधकांनीही बाह्या सरसावल्या आहेत. मात्र या विरोधकांत सध्या गोंधळाची स्थिती आहे.

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यांना येत्या विधानसभा निवडणुकीत धडा शिकविण्याचे जाहीर केले आहे. जरांगे पाटील यांच्या निशान्यावर राज्यातील सत्ताधारी महायुतीचे अनेक नेते आहेत.

राज्यातील ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या विरोधकांना मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेचा आधार वाटू लागला आहे. यामध्ये प्रामुख्याने दराडे कुटुंब आहे. दराडे कुटुंबामध्ये आधीच एक भाऊ शिवसेनेच्या ठाकरे गटात तर दुसरा भाऊ शिवसेनेच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात अशी स्थिती आहे.

एकच कुटुंबात दोन आमदार असलेल्या या कुटुंबाची राजकीय भूमिका काय? यावरून त्यांच्या समर्थकांचाही गोंधळ आहे. अशातच आता त्यांना तिसरे आमदारकीचे वेध लागले आहेत. सध्या शिवसेना ठाकरे गटात जिल्हाप्रमुख असलेले कुणाल दराडे विधानसभा निवडणुकीची तयारी करीत आहेत.

Manoj Jarange Patil & Chhagan Bhujbal
Kavita Raut: आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत नाकारणार नियुक्ती, खेळाडूंशी होतोय दुजाभाव?

आमदार किशोर दराडे यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनचे नेते जरांगे पाटील यांचे दोन वेळा भेट घेतली आहे. नुकतीच त्यांनी जरांगे पाटील यांची भेट घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीत येवला मतदारसंघातील राजकीय स्थितीवर चर्चा केली.

जरांगे पाटील यांचा पाठिंबा मिळाल्यास ओबीसी आणि मराठा या समीकरणातून मंत्री भुजबळ यांना आव्हान उभे राहील, असा आमदार दराडे यांचा दावा आहे. त्यामुळे दराडे यांची ही राजकीय भूमिका चांगलीच चर्चेचा विषय आहे.

येवला मतदार संघात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगला प्रभावी ठरेल अशी स्थिती आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला या मतदारसंघातून हजारो कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेत पाठिंबा दिला होता. या कार्यकर्ते आणि नेत्यांचा मंत्री भुजबळ यांना प्रखर विरोध आहे.

Manoj Jarange Patil & Chhagan Bhujbal
Sambhaji Brigade Politics: संभाजी ब्रिगेडचे आव्हान, संस्कृती रक्षकांना राज्यघटना मान्य आहे की नाही?

सध्या या परस्पर विरोधाच्या दोन्ही घटकांना तिसरा अँगल मिळतो की काय अशी चर्चा आहे. येवला मतदारसंघ महा विकास आघाडीच्या दृष्टीने देखील गंभीर चर्चेचा विषय आहे. या मतदारसंघात आजवर राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी लढत होत आली आहे.

श्री भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून विजयी झाले होते. सध्या ते उपमुख्यमंत्री अजित पवार गटात आहेत. अशा स्थितीत त्यांच्या विरोधात उमेदवार शिवसेना ठाकरे गटाचा की, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा हा प्रमुख मुद्दा आहे.

महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या संकेतानुसार श्री पवार यांनी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षालाच मिळावी असे संकेत दिले आहे. त्याच वेळी शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी देखील नुकताच येवला मतदारसंघात मेळावा घेतला. यावेळी त्यांनी मंत्री भुजबळ यांना आव्हान दिले होते. अशा गोंधळाच्या स्थितीत उमेदवाराचा अंतिम निर्णय ज्येष्ठ नेते पवार घेतील, असे बोलले जाते.

श्री पवार यांच्याकडे येवला मतदारसंघातून अनेक इच्छुक उमेदवार आहेत. यामध्ये प्रामुख्याने सध्या भाजपमध्ये असलेल्या अमृता पवार यांचे देखील नाव घेतले जाते. शिवसेना ठाकरे गटाचे शिवा सुराशे आणि जिल्हाप्रमुख कुणाल दराडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माणिकराव शिंदे आणि जयदत्त होळकर हे इच्छुक उमेदवार आहेत. यातील कोणत्या नावावर एकमत होते हा भुजबळ विरोधकांसाठी महत्त्वाचा मुद्दा असेल.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com