Manoj Jarange: जरांगे आज भुजबळांच्या बालेकिल्ल्यात, भुजबळ फार्मवर बंदोबस्त वाढवला, समता परिषदेचे अध्यक्ष पोलिसांच्या ताब्यात

Manoj Jarange Nashik visit Maratha Reservation Chhagan Bhujbal Samata Parishad: भुजबळ फार्म वर पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. राजेंद्र जगताप आणि विशाल चव्हाण यांना त्यांच्या निवासस्थानावरुन नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Chhagan Bhujbal, Manoj Jarange
Chhagan Bhujbal, Manoj Jarange Sarkarnama
Published on
Updated on

मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) आणि ओबीसी नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यामध्ये आरक्षणावरुन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.भुजबळाच्या बालेकिल्ल्यात जरांगे यांच्या शांतता रॅलीचा नाशिकमध्ये आज समारोप होत आहे. नाशिक पोलिस सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

मनोज जरांगे यांच्या नाशिक दौऱ्यापूर्वी पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मंत्री छगन भुजबळ यांच्या भुजबळ फार्म या निवासस्थानावर पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. समता परिषदेचे सिन्नर तालुकाअध्यक्ष राजेंद्र जगताप आणि शहराध्यक्ष विशाल चव्हाण यांना त्यांच्या निवासस्थानावरुन नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मनोज जरांगे यांच्या दौऱ्यांच्या पार्श्वभूमीवर समता परिषदेचे पदाधिकारी, ओबीसी नेत्यांवर पोलिस नजर ठेवून आहेत. जरांगेच्या दौऱ्यानिमित्त पोलिस यंत्रणा सर्तक झाली आहे. मराठा आंदोलकांमध्ये छगन भुजबळ यांच्याबाबत संतापाची लाट आहे. काही अनुचित प्रकार घडू नये, याची पोलिस काळजी घेत आहे. जरांगे यांच्या रॅलीासाठी नाशिकमध्ये दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त आहे.

Chhagan Bhujbal, Manoj Jarange
RSS News: मतभेद मिटले: महाराष्ट्र जिंकण्यासाठी भाजपसोबत RSSने बाह्या सरसावल्या!

शरद पवार यांनी मराठा आरक्षणाबाबतची काल (सोमवारी) भूमिका मांडली. मनोज जरांगे, मराठा समाजाचे नेते आणि ओबीसी समाजाच्या नेत्यांची एकत्र बैठक झाली पाहिजे, असं मुख्यमंत्र्याना सुचवल्याचं शरद पवार म्हणाले.

शरद पवार यांच्या या विधानाला मनोज जरांगे पाटील यांनी विरोध दर्शवला आहे. शरद पवार यांनी केलेल्या आवाहनाला मनोज जरांगे पाटील यांनी विरोध केला आहे. एकत्र बसण्याची गरज काय? सरकारला माहिती आऱक्षण कसं द्यायचं ते देत नाहीत. चर्चा करून हा नाही तो नाही आला, मग ढकलाढकली कधीपर्यंत करायची. चर्चेला बसण्याची गरज काय आहे?, असा प्रश्न मनोज जरांगे यांनी उपस्थित केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com