

Bhujbal vs Jarange latest news: मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मुंबईत धडकण्याची तयारी सुरु केली आहे. ओबीसीतून मराठा-कुणबी आरक्षणासाठी त्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून गेल्या 14 दिवसांपासून उपोषणावर बसले आहेत. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या भूमिकेकडे सरकारचे लक्ष लागले असताना आता यासंदर्भात ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये याविषयावर माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मनोज जरांगे पाटील यांनी जालन्याच्या महिला जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्याशी घाणेरड्या भाषेत चर्चा केल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. एका महिला जिल्हाधिकाऱ्यांशी अशा पद्धतीने गैरवर्तन करणे योग्य नसल्याचे भुजबळ म्हणाले.
भुजबळ म्हणाले, आशिमा मित्तल या सरकारच्या वतीने त्यांच्याशी बोलण्यासाठी गेल्या होत्या. पण जरांगेंनी अत्यंत घाणेरड्या भाषेत त्यांच्याशी चर्चा केली. त्या नरवस झाल्या होत्या. जरांगे सध्या कुणालाच सोडत नाही, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे, संजय शिरसाट या सगळ्यांना शिव्या देतात. जरांगेंची ही भाषा राजकीय संस्कृतीला शोभणारी नाही. आता सरकारचे शिष्टमंडळ भेटायला जाणार होते तेही भेटायला गेले नाही.
मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा मुंबईत धडकण्याची आणि मोठे आंदोलन उभारण्याची घोषणा केली आहे. या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर भुजबळांनी प्रशासनालाही त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली आहे.
कोणत्याही आंदोलनामुळे सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले जाऊ नये. आंदोलनामुळे लोकांना कोणताही त्रास होणार नाही, हे पाहणे सरकारी यंत्रणेचे काम आहे, असं भुजबळांनी सुनावलं. भुजबळांच्या या आक्रमक प्रतिक्रियेमुळे आता जरांगे आणि भुजबळ यांच्यातील शाब्दिक संघर्ष आणखी भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शिंदेंच्या भाषणावर भाष्य....
एकनाथ शिंदे यांच्या इंग्रजीतील भाषणावर सध्या चर्चा रंगल्या आहेत. स्वत:ला सीएम म्हणून प्रेझेंट करण्यासाठी त्यांनी तशा प्लटफॉर्मचा वापर केल्याचा आरोप होत आहे. त्यावर विचारले असता भुजबळांनी त्यावरही भाष्य केलं. भुजबळ म्हणाले, मला असं वाटत नाही,
हेतू आरोप करण्यात अर्थ नाही. स्वागत झालं आणि भाषण उत्तम झालं. वेगवेगळे लोक जात असतात. मी सुद्धा परदेशात गेलो आहे. आपण काय चांगलं केलं हे सांगतो. एकनाथ शिंदे यांनी जे यश संपादन केलं, त्याबद्दल आनंद असल्याचं भुजबळ म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.