Chhagan Bhujbal Yeola Project : भुजबळांच्या येवल्यात पहिल्यांदाच मोठा उद्योग ; 760 कोटींची गुंतवणूक, हजारोंना रोजगार

Yeola industrial project : येवलेकरांसाठी मोठी गुड न्यूज आहे. येवल्यात पहिल्यांदाच मोठा प्रक्रिया उद्योग येत असून 760 कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. मका उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
Chhagan Bhujbal Yeola industry project
Chhagan Bhujbal Yeola industry projectSarkarnama
Published on
Updated on

Nashik Industrial News : नाशिक जिल्ह्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे. जिल्ह्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांना आता मोठी आणि हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने येवला तालुक्यातील चिचोंडी औद्योगिक वसाहतीत मोठा मका प्रक्रिया उद्योग उभारण्याच्या प्रस्तावाला गती देण्यात आली आहे. सुखजीत स्टार्च कंपनीमार्फत चिचोंडी औद्योगिक क्षेत्रात हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

सुखजीत स्टार्च कंपनीमार्फत या प्रकल्पासाठी सुमारे ७६० कोटी रुपये गुंतवणूक करुन हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. हा दररोज १२०० मेट्रिक टन मका प्रक्रिया करण्याची क्षमता असलेला अत्याधुनिक कृषी-आधारित अन्नप्रक्रिया उद्योग असेल. यानिमित्ताने भुजबळांचा मतदारसंघ असलेल्या येवल्यात पहिल्यांदाच इतका मोठा प्रक्रिया उद्योग येत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ८ सप्टेंबर रोजी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे सुखजित बायोकॉर्न आणि उद्योग विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी येवला मतदारसंघाचे आमदार व राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, उद्योग मंत्री उदय सामंत, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ पी. अनबलगन, माजी खासदार समीर भुजबळ, सुखजित बायोकॉन लिमिटेड चे उपाध्यक्ष आणि आदी उपस्थित होते.

Chhagan Bhujbal Yeola industry project
Chhagan Bhujbal : "ते शिव्या देताय तरी मंत्री पाय धरायला जातायत", भुजबळांचा सरकारला घरचा आहे ; CM फडणवीसांचं नाव घेत दिलं उदाहरण

या प्रकल्पाच्या अनुषंगाने कंपनीने राज्य शासनाकडे आवश्यक पायाभूत सुविधा आणि सहकार्याची मागणी केली आहे. त्यामध्ये सुमारे १५० एकर जमीन, दररोज सुमारे ५ एमएलडी प्रक्रिया पाणी, ६ मेगावॅट वीज जोडणी तसेच प्रकल्पासाठी आवश्यक रस्ते जोडणीचा समावेश आहे. सदर उद्योगाचा मेगा प्रकल्पामध्ये समावेश केल्याबाबत ऑफर लेटर सुद्धा उद्योग विभागाने या कंपनीला दिले आहे.

मक्यापासून स्टार्च

प्रस्तावित प्रकल्पात मक्यापासून स्टार्च आणि त्यापासून तयार होणारी विविध उत्पादने निर्मिती करण्यात येणार आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात दरवर्षी सुमारे ३.५० लाख मेट्रिक टन मक्याची मागणी निर्माण होईल. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील तसेच परिसरातील मका उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी स्थिर, विश्वासार्ह आणि शाश्वत बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

४००० रोजगार

अन्नप्रक्रिया उद्योगाला चालना देण्याबरोबरच या प्रकल्पामुळे कृषी उत्पादनाचे मूल्यवर्धन, स्थानिक अर्थव्यवस्थेला गती तसेच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. प्रकल्पामुळे वस्तू व सेवा कर (GST) तसेच अन्य वैधानिक महसुलाच्या माध्यमातून शासनाच्या महसुलातही भर पडण्याची शक्यता आहे.

हे काम १२ ते १५ महिन्यांत पूर्ण करण्याचे कंपनीचे नियोजन आहे. या उद्योगामुळे १००० डायरेक्टर ३००० पर्यंत इन डायरेक्ट रोजगार निर्मिती होणार आहे.

Chhagan Bhujbal Yeola industry project
Nashik Guardian Minister : मोठी बातमी, नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजनांची नियुक्ती; राज्य सरकारकडून अधिकृत घोषणा, भुजबळ-भुसेंना डच्चू

या प्रकल्पाच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पादनाला अन्नप्रक्रिया उद्योगाची जोड मिळून शेतकरी, स्थानिक उद्योग आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. राज्य शासनाच्या अन्नप्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन देण्याच्या धोरणाशी हा प्रकल्प सुसंगत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com