Girish Mahajan : गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे पाटील यांचा विषय एका वाक्यात संपवला...

Girish Mahajan on Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे.
Manoj Jarange Patil & Girish Mahajan
Manoj Jarange Patil & Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Nashik News: मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला दोन दिवस झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासन काय निर्णय घेते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा राज्यात आंदोलन सुरू झाले आहे. जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. राज्य शासन काय भूमिका घेते, यासाठी आंदोलन समर्थकांना मोठी अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आपले मत प्रकट केले आहे.

Manoj Jarange Patil & Girish Mahajan
Sanjay Raut Politics: संजय राऊत म्हणतात, "हा तर अदानींचा अपमान"

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. याबाबत ते म्हणाले, जरांगे पाटील यांच्याशी यापूर्वीही अनेकदा आंदोलनाविषयी चर्चा झाली आहे. राज्य शासनातर्फे त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न यापूर्वीही करण्यात आला आहे. या विषयावर राज्य शासनाची भूमिका अगदीच स्पष्ट आहे.

Manoj Jarange Patil & Girish Mahajan
ADCC Bank Recruitment : जिल्हा बँकेतील 700 जागांची भरती अडकणार? 'या' मुद्यांवर पुन्हा विरोध सुरू

बऱ्याच वेळा त्यांच्या उपोषणाबाबत समजूत काढण्यासाठी प्रयत्न झाले. मी याबाबत त्यांच्याशी चर्चा देखील केलेली आहे. त्यामुळे आता त्याविषयी मी काहीही बोलणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच त्याबाबत भूमिका मांडतील, असे त्यांनी सांगितले.

मराठा आरक्षणाचे नेते जरांगे पाटील यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात काय आहे? हे समजले पाहिजे. ते मराठा आरक्षण देणार की नाही, याचे स्पष्टीकरण त्यांनी द्यावे. याबाबत त्यांनीच निर्णय घेणे आवश्यक आहे असे स्पष्ट केले होते.

दरम्यान खासदार डॉ कल्याण काळे यांनी जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत राज्य शासनाशी संपर्क केला होता. राज्य सरकारमधील प्रमुख लोकांची बैठक मंगळवारी (ता. २८) मुंबईत होणार आहे. आमचे सरकार आल्यास मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढू, असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिले होते. ते आश्वासन त्यांनी पाळावे, असे आवाहन देखील खासदार काळे यांनी केले.

एकंदरच जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत राज्य शासन आता सावध भूमिका घेत आहे. राज्यातील महायुती सरकारकडे मोठे बहुमत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार काम करीत आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावर काय भूमिका घेतली जाते, याची उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com