Manoj jarange Patil: जरांगे पाटील घेणार सत्ताधाऱ्यांचा समाचार, कार्यकर्ते झाले रिचार्ज!

Manoj Jarange Patil, Maratha reservation issue, The political atmosphere will heat up again- मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये पुन्हा वातावरण तापणार.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Maratha reservation News: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या दौऱ्याची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जरांगे पाटील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षाविरोधात वातावरण तापवणार आहेत.

जरांगे पाटील येत्या १३ ऑगस्टला नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा आहे. यात प्रामुख्याने राज्य सरकार आणि भारतीय जनता पक्षाने मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर घेतलेल्या भूमिकेचा जरांगे पाटील समाचार घेतील.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच हा दौरा होत आहे. त्यामुळे राज्याचे ओबीसी नेते, मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदार संघात पुरणगाव येथील ग्रामस्थांनी ठराव केला आहे. जरांगे पाटील यांनी पुरणगाव येथे आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

पुरणगाव (ता. येवला) त्यांच्या पाठीशी असेल, असा ठराव या ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांचा दौरा राजकीय कार्यकर्त्यांना देखील ऊर्जा देणारा ठरेल. त्या दृष्टीने सध्या मराठा आरक्षणाचे समर्थक कार्यकर्ते एकवटू लागले आहे. येवला मतदारसंघात निवडणुकीची हवा तापली आहे.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले कोण आहेत मनोज जरांगे-पाटील ?

यापूर्वीच सकल मराठा समाजाने जरांगे पाटील यांच्या दौऱ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. त्यासाठी स्वखर्चाने सर्व व्यवस्था करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. उद्या (ता. ३) नाशिकमध्ये जरांगे पाटील यांच्या दौऱ्याच्या नियोजनासाठी कार्यकर्त्यांचा मेळावा होत आहे. त्यात विविध संघटना सहभागी होत आहेत.

त्यानिमित्त पुन्हा एकदा मराठा आंदोलनाचे कार्यकर्ते एकत्र येणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सर्व घडामोडी घडत आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता आहे.

भारतीय जनता पक्षाने जरांगे पाटील यांची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचा प्रस्ताव मांडला होता. पक्षाचे अनेक पदाधिकारी जरांगे पाटील यांच्या विरोधात वक्तव्य करीत आहेत. नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्रातील सत्तांतर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा आणि शिवसेना शिंदे गटाचे दोन असे आठ आमदार भाजपला सामील झाले आहेत. अशा स्थितीत जिल्ह्यातील जवळपास सर्वच आमदार सत्ताधारी गटाचे आहेत.

Manoj Jarange Patil
Ajit Pawar Politics: वाहतूक कोंडीवर अजित पवारांचे भाषण.... प्रवास मात्र विमानाने!

जरांगे पाटील यांनी राज्य सरकारशी उघड शत्रुत्व स्वीकारले आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या या सर्व आमदारांच्या चिंतेत भर पडणार आहे. त्या दृष्टीने मनोज जरांगे पाटील यांचा नाशिकचा दौरा निवडणुकीसाठी कोणते राजकीय 'नॅरेटीव्ह' ठरवून जातो, याची उत्सुकता आहे.

महायुती सरकारची मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सातत्याने आपली भूमिका गोंधळात टाकणारी आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी सगेसोयरे या विषयावर आश्वासन दिले होते. त्याचा मसुदा देखील जरांगे पाटील यांना दिला होता. आता तो विषय मागे पडला आहे. त्यामुळे जरांगे पाटील संतप्त आहेत. त्यांच्या आंदोलनाचा प्रभाव अद्याप टिकून आहे की नाही? हे देखील या दौऱ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजप आणि सहकारी पक्ष या आंदोलनाबाबत सावधगिरी बाळगून आहेत.

------

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com