Manoj Jarange Patil: भुजबळांविरोधात उमेदवारीसाठी शिवसेनेचे शिवा सुराशे जरांगे पाटलांच्या भेटीला

Shiva Surashe Meets Manoj Jarange Patil : शिवसेना नेते शिवा सुराशे येवला विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत.
Chhagan Bhujbal & Shiva Suroshe
Chhagan Bhujbal & Shiva SurosheSarkarnama
Published on
Updated on

Yeola Constituency News: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यंदा विधानसभा निवडणुकीत उमेदवार देण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांना तिसरा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्याचा राजकीय पक्षांना फटका बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

येवला विधानसभा मतदारसंघात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार असतील. सध्या तरी तसे राजकीय चित्र निर्माण झाले आहे. भुजबळ यांच्या विरोधात उमेदवार कोण? याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

या संदर्भात विविध उमेदवार इच्छुक आहेत. त्यांनी विधानसभा मतदारसंघात गाठीभेटी घेत प्रचार देखील सुरू केलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने लासलगाव परिसरातील ४६ गावांमध्ये मराठा आरक्षणाच्या विषयावर वातावरण तापलेले आहे.

मंत्री भुजबळ यांना या भागातून मोठे आव्हान देण्यासाठी नेत्यांची धडपड आहे. त्यात कोणत्या उमेदवाराच्या नावावर एक मत होते, याची उत्सुकता आहे. या सर्व राजकारणात आता एक नवा फॅक्टर पुढे आला आहे.

Chhagan Bhujbal & Shiva Suroshe
Manoj Jarange: भुजबळांच्या बालेकिल्ल्यात 15 जागांसाठी 150 मराठा उमेदवार इच्छुक; 29 तारखेला जरांगे घेणार निर्णय

येवला लासलगाव मतदार संघातील ४६ गावातील शिवसेनेचे तालुकाप्रमुख आणि निफाड पंचायत समितीचे माजी सभापती हे प्रमुख इच्छुक आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ते पदाधिकारी आहेत. त्यांनी ठाकरे यांच्याकडे उमेदवारी देखील मागितली आहे.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर श्री सुराशे यांनी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. त्यांच्याकडे आपले माहिती पत्र देत जरांगे पाटील यांच्याकडे उमेदवारीची मागणी केली आहे. उमेदवारी मिळाल्यास उमेदवारी करण्याची तयारी असल्याचे ते म्हणाले.

जरांगे पाटील यांच्या आशीर्वादाने ही निवडणूक लढविण्याची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. मराठा समाजाविषयी अत्यंत द्वेषपूर्ण भूमिका असलेले भुजबळ हे नेते आहेत. त्यांना राज्यातील विविध सत्ताधारी नेत्यांचा पाठिंबा आहे. सत्ताधारी पक्षाचे नेते म्हणून त्यांनी सातत्याने मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला आहे.

Chhagan Bhujbal & Shiva Suroshe
BJP Politics: कांदा खरेदीत सावळागोंधळ, भाजपच्या कोणत्या नेत्यांवर संशयाची सुई?

समाजामध्ये जाती-जातीत भेद आणि द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे भुजबळ यांचा पराभव करणे, हे आपले प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यासाठीच गेले अनेक दिवस मतदारसंघात गाठीभेटी घेत वातावरण निर्मिती करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

येत्या २९ तारखेला आंतरवेली सराटी येथे होणाऱ्या बैठकीत विधानसभा निवडणुकीत काय भूमिका घ्यावी हे जाहीर होणार आहे. त्या आधीच विविध पक्षांतील इच्छुकांना उमेदवारीची स्वप्न पडू लागलेली आहेत.

यातील अनेक इच्छुक जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण चळवळीत देखील सक्रिय काम करीत आहेत. त्यामुळे त्यांनी उमेदवाराची मागणी केल्यास प्रस्थापित राजकीय पक्षांना धक्का बसण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com