Maratha Reservation: जरांगे पाटील यांचा आज खानदेशमध्ये विक्रम, एकाच दिवशी चार सभा!

Manoj Jarange Patil will adressed four public meeting Jalgao & Dhule-जरांगे पाटील यांच्या सभेसाठी पोलिस यंत्रणा सतर्क, तर कार्यकर्ते मनापासून तयारीला लागले आहेत. त्यामुळे या चार विशाल सभांना मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Manoj Jarange Patil News : राज्यातील प्रस्थापित नेत्यांना आव्हान देत सर्वाधिक चर्चेतील चेहरा असलेले मनोज जरांगे पाटील आज खानदेशात नवा विक्रम करणार आहेत. त्यांच्या आज एकाच दिवशी चार सभा आहेत. त्यासाठी शेकडो कार्यकर्ते राबत असल्याने या सभांत ते कोणाला लक्ष्य करतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. (Manoj Jarange Patil will adress the Meeting in Chalisgaon, Jalgaon, Amalaner & Dhule)

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) राज्य सरकार (Maharashtra Government) तसेच प्रशासनावर सामाजिक दबाव ठेवण्यात यशस्वी झालेल्या मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील वातावरण ढवळून काढले आहे. आज ते खानदेशचे (Dhule) मैदान गाजवणार आहेत.

Manoj Jarange Patil
Congress Vs BJP Politics : के. सी. पाडवी यांचा भाजप नेत्यांवर हल्लाबोल...

मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षण मिळविण्याच्या मागणीसाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आज धुळे, जळगाव, चाळीसगाव आणि अंमळनेर अशा चार सभा होणार आहेत. या सभांसाठी धुळे व जळगाव जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यातून मराठा समाजबांधव परिवारासह उपस्थित राहतील, असे नियोजन आहे.

धुळे शहरातील सभेसाठी धुळे जिल्हा सकल मराठा समाजातर्फे तयारी पूर्ण झाली आहे. सभेच्या अनुषंगाने ३५० पोलिसांचा बंदोबस्त तैनात असेल. या सभेसाठी धुळे जिल्ह्यातील गावागावांत प्रचार केला असून, आरक्षणाच्या या लढ्यात परिवारासह सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सभेसाठी सकल मराठा समाजातर्फे दहा समित्या तयार करण्यात आल्या असून, ५०० स्वयंसेवकांच्या मदतीने सभेसाठी येणाऱ्या समाजबांधवांची कोणतीही गैरसोय होऊ नये याची दक्षता घेणार आहेत.

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने एल्गार पुकारला असून, त्या पार्श्‍वभूमीवर जळगाव जिल्ह्यात जरांगे पाटील यांच्या जळगावसह चाळीसगाव, अमळनेर, धरणगावमध्ये होतील. सभेच्या निमित्ताने शनिवारी शहरातून मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी सुमारे २०० मोटारसायकलींद्वारे रॅली काढून वातावरण निर्मिती केली. त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

उत्तर महाराष्ट्रात राज्यातील सध्याच्या सरकारमधील पाच मंत्री आहेत. त्यातील गिरीश महाजन यांनी जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असताना मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी त्यांच्याशी अनेकदा दूरध्वनीवरून चर्चा केली होती, तर छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांच्याशी थेट पंगा घेतलेला आहे. दुसरीकडे एकाच दिवशी चार सभा घेण्याचा विक्रम जरांगे पाटील करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या सभांमध्ये कोणाला टीकेचे लक्ष्य करतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Manoj Jarange Patil
Telangana Election Result 2023 : केसीआर हॅटट्रिक करणार का ? काँग्रेसने 'असे' दिले आव्हान...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com