Jarange Patil News : जरांगे पाटलांच्या सभेचा लाभ कोणाला, तोटा कोणाला?

Manoj Jarange-Patil`s Public meeting will cahnge the politics Of Sinner & Yeola-जरांगे पाटील यांच्या सभेच्या निमित्ताने परस्परांचे विरोधकही एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाल्याने मतदारांचा मूड बदलण्याची चिन्हे
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama

Maratha Resrvation Issue : जालना येथील मराठा आरक्षणावर उपोषणाचे हत्यार उपसून राज्याच्या राजकारणातील एक महत्त्वाचे केंद्र बनलेले मनोज जरांगे पाटील रविवारी नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. या वेळी सकल मराठा समाजातर्फे त्यांचे स्वागत होणार आहे. सभादेखील होईल. त्यामुळे कार्यकर्त्यांत त्याची एक वेगळीच चर्चा सुरू आहे. (Poor and farmers of Maratha community have serious anger on established Politician)

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange-Patil) यांच्या उपस्थितीत येवला, (Yeola) तसेच सिन्नर (Sinner) येथे सभा होणार आहेत. या सभेसाठी परस्परांचे विरोधकदेखील एकत्र आले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांतील (Maratha Reservation) उत्साह राजकारणाला नवे वळण देणार का? याची चर्चा आहे.

Manoj Jarange Patil
Ajit Pawar News : पवा,रांच्या दौऱ्याने तरी दिंडोरीच्या रस्त्यांचे भाग्य उजळेल का?

मराठा आरक्षणाचे प्रतीक बनलेल्या जरांगे पाटील यांची नाशिक जिल्ह्यातील पहिली सभा सकल मराठा समाजातर्फे तसेच छावा मराठा संघटनेतर्फे पांगरी येथे रविवारी होणार आहे. त्यानंतर सोमवारी सकाळी येवला येथे सभा होणार आहे. या वेळी सभेला मोठी उपस्थिती राहावी, यासाठी अनेक संघटना व पदाधिकारी, नेते कामाला लागले आहेत.

पांगरी येथे संत हरिबाबा मंदिरासमोर सिन्नर-शिर्डी मार्गालगत ही सभा होईल. माजी नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले, बाजार समितीचे माजी सभापती रमेश पांगारकर, महामित्र परिवाराचे दत्ता वायचळे, निवृत्त प्रा. राजाराम मुंगसे, नामदेव कोतवाल, जगदीश पांगारकर, संपत पगार, मयूर पांगारकर, कैलास दातीर, विठ्ठल जपे, हरिभाऊ तांबे, सुभाष पगार, दत्तू पवार, भाऊसाहेब शिंदे, वामनराव पवार असे परस्परांचे कट्टर विरोधक असलेली मंडळीदेखील यासाठी एकत्र आल्याचे दिसून येते. त्याचा समाजात व तालुक्याच्या राजकारणात वेगळा संदेश गेला आहे. नाशिक जिल्ह्यात कुणबीचे दाखले मिळतात. मात्र, ते सरसकट मिळावेत, ही आमची मागणी आहे. यासंदर्भात जरांगे पाटील मार्गदर्शन करणार आहेत. जरांगे पाटलांना अनेक गावांतून पाठिंबा मिळाला आहे. पाठिंबा म्हणून राज्यात अनेक ठिकाणी साखळी उपोषण सुरू आहेत. पांगरी, नासिकसह विविध ठिकाणीदेखील उपोषण सुरू आहे. त्याला अनेकांनी पाठिंबा दिला आहे. यासंदर्भात तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये नियोजनासाठी बैठका झाल्या. त्यामुळे या सभेने सिन्नर तसेच येवल्याच्या राजकारणाला नवी दिशा मिळणार का, याची चर्चा आहे.

नाशिक जिल्ह्यात कुणबीचे दाखले मिळतात. मात्र, ते सरसकट मिळावेत, ही आमची मागणी आहे. यासंदर्भात जरांगे पाटील मार्गदर्शन करणार आहेत. जरांगे पाटलांना अनेक गावांतून पाठिंबा मिळाला आहे. पाठिंबा म्हणून राज्यात अनेक ठिकाणी साखळी उपोषण सुरू आहेत. पांगरी, नासिकसह विविध ठिकाणीदेखील उपोषण सुरू आहे. त्याला अनेकांनी पाठिंबा दिला आहे. यासंदर्भात तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये नियोजनासाठी बैठका झाल्या. त्यामुळे या सभेने सिन्नर तसेच येवल्याच्या राजकारणाला नवी दिशा मिळणार का, याची चर्चा रंगली आहे.

Manoj Jarange Patil
Sharad Pawar की Ajit Pawar ; राष्ट्रवादी कोणाची, आज तुफान खडाजंगी, बघा काय घडलं ? | NCP

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com