Maratha Reservation News : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा आणि आंदोलकांवरील गुन्हे तत्काळ मागे घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. मात्र, त्यावर काहीच कार्यवाही झालेली नाही. यावर धुळे शहरातील सकल मराठा समाज संतप्त असून, मोठे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.Manoj Patil Hunger Strike
यासंदर्भात धुळे सकल मराठा समाज यांच्या वतीने काल राज्य शासनाच्या भूमिकेचा अतिशय आक्रमक शब्दांत निषेध करण्यात आला. राज्य शासन आणि मंत्रिमंडळातील सदस्य जरांगे पाटील यांच्या उपोषणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. त्यांचा हेतू जरांगे पाटील यांना इजा पोहोचवण्याचा तर नाही ना? अशी शंका येते. मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीरपणे आश्वासन दिले होते तसे लेखी आश्वासनदेखील देण्यात आले. मात्र, अद्याप काहीही कार्यवाही नाही. त्यामुळे राज्य सरकारच्या भूमिकेबाबत शंका उपस्थित होते, असे सकल मराठा समाजाच्या समन्वयकांनी म्हटले आहे.
अंतरवाली सराटी येथे गेल्या सहा दिवसांपासून जरांगे पाटील यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. सध्या त्यांच्या प्रकृतीस धोका निर्माण झाला असून, शरीरात निर्जलीकरण झाल्याने नाकातून रक्त वाहत आहे. तरीही राज्य सरकार चर्चा आणि अधिवेशनाचा घोळ घालत आहे. त्यामुळे अतिशय संतप्त वातावरण निर्माण झालेले आहे. जरांगे पाटील यांच्या प्रकृतीस धोका निर्माण झाल्यास, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्याला पूर्णतः जबाबदार राहतील, असा इशारा या वेळी देण्यात आला.Manoj Patil Hunger Strike
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशी येथे मराठा आंदोलकांना (Maratha Reservation) जाहीरपणे आश्वासन दिले होते. घोषणादेखील केली होती. त्याची अद्याप अंमलबजावणी होत नसल्यास यात नक्कीच काही झारीतले शुक्राचार्य आहेत. मंत्रिमंडळातील काही सदस्य मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेला आणि मराठा आरक्षणाच्या निर्णयाला विविध प्रकारे आक्षेप घेत आहेत. हे सर्व गोंधळाचे वातावरण जाणीवपूर्वक निर्माण केले जात आहे का?. शासनाची यावर काय भूमिका आहे?. असे गंभीर प्रश्न मराठा समाजात निर्माण झाले आहेत. त्याचे तातडीने निराकरण न झाल्यास त्याची झळ शासनाला बसेल, असे सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.Maratha Reservation News
धुळे सकल मराठा समाजाकडून समन्वयक सुधाकर बेंद्रे, साहेबराव देसाई, निंबा मराठे, विनोद जगताप, राजेंद्र काळे, भानुदास बगदे, सुनील पाटील, हरिश्चंद्र वाघ, मनोज ढवळे, संदीप पाटोळे, विकास बाबर, अशोक सुडके, अमर फरताळे, अशोक तोटे यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. त्यांनी सामुदायिक पत्र प्रकाशित करण्यात आले.
Edited By : Rashmi Mane
R