Eknath Shinde : "श्रीकांतचं भाषण संपताच त्याच्या अन् माझ्या डोळ्यांत अश्रू, शिवसेना कुटुंबही...", मुख्यमंत्र्यांचं भावनिक ट्विट

Eknath Shinde On Shrikant Shinde : "...अन् श्रीकांतच्या मुखातून निघालेल्या शब्दांमधून मला माझा काल दिसला," असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
Eknath Shinde Shrikant Shinde
Eknath Shinde Shrikant Shindesarkarnama
Published on
Updated on

कोल्हापुरात शिवसेनेचं ( शिंदे गट ) महाअधिवेशन पार पडत आहे. या अधिवेशनात खासदार श्रीकांत शिंदे यांनी भावनिक भाषण केलं. यानंतर भावूक झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनीही 'एक्स' अकाउंटवर ट्विट केलं आहे. "शिवसेना हेच माझं सर्वस्व होतं, शिवसैनिक हेच माझं कुटुंब होतं, पण श्रीकांत शिंदेंच्या मुखातून निघालेल्या शब्दांमधून मला माझा काल दिसला," असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं.

Eknath Shinde Shrikant Shinde
Lok sabha Election 2024 : ठरलं, बारामतीनंतर सर्वाधिक चर्चेची ठरणार 'ही' निवडणूक!

एकनाथ शिंदे म्हणाले, "'शिवसेना' या चार अक्षरी मंत्राचा जयघोष करत पक्षासाठी मी माझी वाटचाल सुरू केली होती. किसननगरच्या दहा बाय दहाच्या एकत्रित कुटुंबातून सुरू झालेला माझा प्रवास अथक प्रयत्न आणि परिश्रमाने राज्याच्या सर्वोच्च पदापर्यंत कसा येऊन पोहोचला ते श्रीकांतने आपल्या भाषणातून अगदी समर्पक शब्दांत मांडले."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"शिवसेना हेच माझं सर्वस्व होतं, शिवसैनिक हेच माझं कुटुंब होतं. आयुष्यभर मी त्यांच्यासाठी काम केलं पुढे काय होईल याची मला अजिबात कल्पना नव्हती, नेहमी पुढचा विचार करणाऱ्या माझ्या मनाने मागे वळून कधी पाहिले नव्हते, पण श्रीकांतच्या मुखातून निघालेल्या शब्दांमधून मला माझा काल दिसला," असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

Eknath Shinde Shrikant Shinde
Milind Deora : काँग्रेस सोडण्यामागं नेमकं कारण काय? मिलिंद देवरा म्हणाले, "तो एक..."

"सगळा प्रवास झरकन डोळ्यांसमोरून निघून गेला. त्यांचे भाषण जसे संपले तसे आम्ही दोघेही मनातून मोकळे झालो. नकळत त्याच्याही आणि माझ्याही डोळ्यांत अश्रू अनावर झाले. आमच्यासह आमचे शिवसेना हे कुटुंबही पुरते हेलावून गेले. या वेळी माझ्या प्रत्येक सुखदुःखात सोबत असलेले माझे कुटुंबीय माझे शिवसैनिक हेच या क्षणांचे सोबती होते," असं भावनिक ट्विट मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

Eknath Shinde Shrikant Shinde
Loksabha Election 2024 : 'म्हाडा दिले म्हणून गप्प बसणार नाही...'; आढळराव पाटलांचा लोकसभा लढण्याचा पक्का बेत

श्रीकांत शिंदे काय म्हणाले?

"मुख्यमंत्र्यांनी कधीही माझ्याबरोबर सण साजरे केल्याचं मला आठवत नाही. आमच्यासाठी कधी वेळ देणार? ही तक्रार आम्ही सतत त्यांच्याकडे करायचो. त्याचं उत्तर कधीही त्यांनी दिलं नाही," असं म्हणत श्रीकांत शिंदेंच्या डोळ्यांत अश्रू आले.

Eknath Shinde Shrikant Shinde
Nilesh Lanke News : वकील आढाव दाम्पत्याच्या हत्येतील आरोपींचा पोलिसांना दम, आमदार लंकेंचा गौप्यस्फोट

"मला माझ्या वडिलांचा अभिमान आहे. त्यांनी सर्व शिवसैनिकांना आपलं कुटुंब मानलं. म्हणून साधारण शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकला," असंही श्रीकांत शिंदेंनी सांगितलं.

R

Eknath Shinde Shrikant Shinde
Pankaja Munde News : पंकजा मुंडेंच्या अडचणी संपेनात; कारखान्याला 'जीएसटी'नंतर 'पीएफ'ची नोटीस

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com