
नाशिक : (Nashik) महाराष्ट्राचा (Maharashtra) चेहरा बदलण्यासाठी शैक्षणिक (Education) क्षेत्राचे योगदान अतिशय महत्वाचे आहे. राज्यात अनेक शैक्षणिक संस्था उत्तम काम करत आहे. या संस्थांच्या मागे राज्यातील सामान्य माणूस उभा आहे, हे वेगळंपण आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (NCP) राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले. (Sharad Pawar Felicitate MVP Gen. Secretary Adv. Nitin Thackrey
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते `मवीप्र` संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांचा सत्कार झाला. यावेळी शिक्षणतज्ञ डॉ. मो. स. गोसावी, पालकमंत्री दादा भुसे, ज्येष्ठ नेते हेमंत टकले, ॲड.जयंत जायभावे, ॲड. अविनाश भिडे उपस्थित होते.
यावेळी श्री. पवार म्हणाले की, देशात नवीन शैक्षणिक धोरण आणले जात आहे. यामध्ये काही नवीन बाबी समोर येत आहेत. त्यातून काही प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन या धोरणातील चांगल्या गोष्टी घेण्यासाठी चर्चा करावी. पुढची पिढी समृध्द होण्यासाठी या शैक्षणिक संस्थांचे योगदान महत्वाचे आहे. नवीन पिढी समृध्द होण्याबरोबरच नवंनवीन क्षेत्रात जाऊन काम करू शकली पाहिजे.
ते पुढे म्हणाले की, आपला देश शेतीप्रधान आहे. पूर्वी ३५ टक्के लोक शेती करत होते. आता ५६ टक्क्यांहून अधिक लोक शेती करीत आहेत. मात्र पूर्वी शेती क्षेत्र किती होते आणि आता किती आहे याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. शेतीवर अधिक बोजा असून शिक्षणाच्या माध्यमातून नवनवीन संशोधन करण्याची गरज आहे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणासाठी मोठं योगदान दिलं. शेतीला वैज्ञानिक दृष्टिकोन देऊन शेतीला समृध्द करण्याची दृष्टी दिली. त्यानुसार शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना विज्ञाननिष्ट दृष्टी द्यावी.
पवार म्हणाले, नाशिकमध्ये गोखले एज्युकेशन संस्थेच्या वाटचालीत डॉ. मो. स. गोसावी यांचे योगदान अतिशय महत्वपूर्ण आहे. मराठा विद्या प्रसारक समाज यासह अनेक संस्था कार्यरत आहे. मराठा विद्या प्रसारक संस्था ही महाराष्ट्राला प्रतिष्ठा देणारी, विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देणारी संस्था आहे. या संस्थेची धुरा नितीन ठाकरे सांभाळत आहे. यापुढील काळात जगभरातील विद्यापीठांशी जोडून संस्था काम करेल असे त्यांनी सांगितले. तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये राजकारण आणू नये, एका चौकटीच्या बाहेर जाऊ नये असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी आमदार माणिकराव कोकाटे, ॲड.आशिष देशमुख, ॲड. भगवान साळुंखे, ॲड. सतीश देशमुख, ॲड.हेमंत धात्रक, ॲड. विलास लोणारी, डॉ. अभिमन्यू पवार, माजी आमदार जयंत जाधव, ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा, डॉ. अविनाश धर्माधिकारी, परवेज कोकणी, ॲड. रवींद्र पगार उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.