Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या पायी दिंडीच्या व्यवस्थेसाठी १०० एकरवर नियोजन

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी मराठा समजाला दिंडीने मुंबईकडे निघण्याचे आवाहन केले आहे.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Nagar News : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी मराठा समजाला दिंडीने मुंबईकडे निघण्याचे आवाहन केले आहे. मनोज जरांगे यांच्या या दिंडीचा मार्ग नगर जिल्ह्यातून असणार आहे. नगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यात या दिंडीचा मुक्काम असून, याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यासाठी पाथर्डी तालुक्यातील आगसखांड येथील 100 एकरावरच्या शिवाराची साफसफाई करण्याचे काम जोरात सुरू आहे.

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात असल्याचे जाहीर केले आहे. मराठा आरक्षण घेण्यासाठी मुंबईत मराठा समाजाला एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. यासाठी अंतरावाली सराटी येथून मनोज जरांगे पायी दिंडीने मुंबईकडे निघणार आहे. मनोज जरांगे यांची ही दिंडी पाथर्डी येथे असणार आहे. तिथे जेवण्याची सोय असणार आहे. यासाठी पाथर्डी येथील आगसखांड शिवारातील 100 एकर जमिनीवर साफसफाईची काम युद्धपातळीवर सुरू आहे.

Manoj Jarange Patil
Monika Rajale : एकहाती सत्ता तरी मोनिका राजळेंचा कस लागणार; समर्थकांनीच वाढवली डोकेदुखी

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मुंबईला अंतरवाली सराटी (जि. जालना) येथून शनिवारी (ता. 20) लाखो मराठाच्या संख्येने निघणार आहे. सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती समाजाचे पदाधिकारी या दिंडीत सहभागी होतील. अंतरवाली सराटी या ठिकाणी दिंडी निघाल्यानंतर तिचा पहिला मुक्काम हा बीड जिल्ह्यात असणार आहे. हा मुक्काम मातोरी (ता. शिरूर) या गावात होईल.

यानंतर रविवारी (ता. 21) ही पदयात्रा निघून सकाळीं आठ वाजता पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी या गावात प्रवेश करेल. या दिंडीच्या स्वागतासाठी पाथर्डी तालुक्यातील गावागावातील सकल मराठा समाज आणि कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. ही दिंडी मिडसांगावी ते करंजी घाट दरम्यान सुमारे 60 किलोमीटरचे अंतर पाथर्डी तालुक्यातून कापणार आहे. या रस्त्यावर गावातील लोकांनी दिंडीतील लोकांसाठी अल्पोपाहार आणि पाण्याची व्यवस्था केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मातोरी (ता. शिरूर) या ठिकाणाहून दिंडी निघाल्यानंतर आगसखांड (ता. पाथर्डी) येथे मुक्काम ठोकले. या ठिकाणी दिंडीतील लाखो लोकांची जेवण, चहा, पाणी व विश्रांतीची व्यवस्था असणार आहे. यासाठी १०० एकराहून अधिक जागेवर सफसफाईचे काम सध्या जोरात सुरू आहे. या ठिकाणी, पार्किंग, निवारा, रुग्णवाहिका अशा सुविधा उभारण्याचे काम सुरू आहे. दहा जेसीबी यंत्राच्या साह्याने त्या परिसरातील साफसफाई करण्याचे काम सुरू आहे.

भाजप आमदार राजळेंची भेट

मनोज जरांगे यांची ही दिंडी पाथर्डीतील आगसखांड येथे येणार असून, तेथील परिसराची साफसफाई सुरू आहे. या परिसराची भाजप आमदार मोनिका राजळे(Monika Rajale) यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत सकल मराठा समाजातील कार्यकर्ते होते. पाथर्डी तालुक्यातील गावा गावातील सकल मराठा समाज बांधव स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन याकामी पुढाकार घेत आहे. सकल मराठा समाजातील बहुसंख्य कार्यकर्ते पदयात्रेच्या नियोजनासाठी तन-मन-धनाने योगदान देत आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Manoj Jarange Patil
Sharad Pawar In Baramati : ...अखेर बारामतीकरांपुढे पवार बोललेच; म्हणाले, 'सोडून गेलेल्यांना...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com