Sharad Pawar In Baramati : ...अखेर बारामतीकरांपुढे पवार बोललेच; म्हणाले, 'सोडून गेलेल्यांना...'

Loksabha Election : आगामी निवडणुकांसाठी शरद पवारांनी ठोकला शड्डू
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Baramati Political News : आगामी लोकसभा, विधानसभेसह जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आदी निवडणुका लढवणार आहोत. त्याची रणनीती एकत्र बसून ठरवूयात. आता लोकसभेची निवडणूक आहे. जनता आपल्याबरोबर आहे. या निवडणुकीत लोकांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याची जाबाबदारी प्रमाणीकपणे पार पाडावी. सोडून गेलेल्यांना धडा शिकवण्यासाठी राज्यातील पक्षाचे पदाधिकारी रात्रंदिवस काम करत आहेत. आता बारामतीकरांची साथ मिळाली, तर महाराष्ट्रात परिवर्तन घडवू, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवारांनी सर्व निवडणुकांस आपण तयार असल्याचे स्पष्ट केले.

बारामतीसह (Baramati) पुणे जिल्ह्यात पक्षाची ताकद मजबूत करण्यासाठी जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळेंनी केलेल्या कृती आराखड्यावर गोविंद बाग येथे पवारांच्या यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीवर प्रथमच बारामतीमधील कार्यकर्त्यांसमोर आपली निर्णायक भूमिका मांडली. तसेच पक्ष सोडून गेलेल्यांना जनता धडा शिकवेल, असे म्हणत फटकारले.

Sharad Pawar
Manoj Jarange : मुंबईतील आंदोलनाबाबत मनोज जरांगेंची मोठी अट; दोन दिवसात काय होणार ?

शरद पवार म्हणाले, केंद्र व राज्यात ५० वर्षांपेक्षा अधिक काळ सत्तेत आणि विरोधात होतो. सुप्रिया (Supriya Sule) तीन वेळा खासदार झाली. तिच्याकडे कर्तुत्व आणि नेतृत्व असतानाही हिंगोलीच्या सुर्यकांता पाटील, पी. ए. संगमा यांच्या मुलीला महिला मंत्री म्हणून पुढे आणले. इतरांना सत्तेत मोठमोठी जबाबदाऱ्या दिल्या. मात्र मुलगी असूनही सुप्रियाला बाजूला ठेवले. आता मात्र अनेक लोक पक्षाला सोडून गेले. त्यांना महाराष्ट्रातील जनता मतपेटीतूनच बाजूला करेल, अशा शब्दात पवारांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवारांसह इतर मंडळींना नाव न घेता फटकारले.

Sharad Pawar
Ravikant Tupkar : मोठी बातमी! शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांनी केली अटक; 'हे' आहे कारण?

निवडणुकीत त्यांना जागा दाखवणार

शरद पवार म्हणाले, 'पक्ष फुटला आणि काही लोक सत्तेत सहभागी झाले. पक्षाला सोडून गेलेले लोक मनाने नाही तर भितीपोटी, सत्तेतील पदांसाठी गेलेली आहेत. आता त्यातील अनेकजण बारामती वगळता इतर ठिकाणी येऊन भेटतात आणि योग्य वेळी आम्ही तुमच्याबरोबर येतो, असे सांगतात. याता जे गेले त्यांचा विचार करू नका.'

'अंतुले मुख्यमंत्री होते, तेव्हा ७० पैकी ६२ आमदार मला सोडून गेले होते. पुढच्या निवडणुकीत त्यातील ५८ आमदारांना लोकांनी पाडले. त्यांच्या जागी अत्यंत सामन्य कार्यकर्ते आमदार झाले होते. आताही तीच स्थिती आगामी निवडणुकांमध्ये पाहावयास मिळेल,' असा विश्वास व्यक्त करत त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) गटालाही इशारा दिला.

दरम्यान, (Sharad Pawar) शरद पवारांनी निवडणुकांबाबत मांडलेल्या सर्व निर्णयांना उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला. यावेळी तालुकाध्यक्ष अॅड.एस.एन.जगताप, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतिश खोमणे, शहराध्यक्ष संदीप गुजर, जिल्हा सरचिटणीस नितीन आटोळे, शहर युवक अध्यक्ष सत्यव्रत काळे, सुभाष ढोले, राजेंद्र काटे, गौरव जाधव, बबनराव हिरवे, भगतसिंग जगताप, शरद तुपे, प्रदीप जगदाळे, राजेंद्र काटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

(Edited by Sunil Dhumal)

Sharad Pawar
Shivsena (UBT) News : अंबादास दानवेंचा 'जनाधिकार' की लोकसभेसाठी 'जनाधार' ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com