Nagar : मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा मुंबईकडे निघाली आहे. सरकार आता जरांगे पाटील यांच्यासोबत संपर्कात नसल्याचे सांगितले जात आहे. अजित पवार यांनी देखील जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधत संविधानाच्या मार्गाने प्रश्न सोडवू त्यांनी धीर धरावा, असे म्हटले होते. त्याला मनोज जरांगे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच छगन भुजबळ यांना देखील चॅलेंज केले आहे.
'धीर काय असतो हेच कळेना. त्यांना म्हणा एकदा या तरी. लांबच राहाता नुसते. एकदा या. दूध का दूध, पाणी का पाणी करू. सात महिन्यात एकदा देखील आले नाही. बाकीचे येऊन दमलेत. सात महिने वेळ दिला आहे. हा वेळ थोडा नाही. उलट अजितदादांनी (Ajit Pawar) गोरगरिब मराठ्यांच्या बाजूने बोलले पाहिजे, अजितदादा येत नसतील तर त्यांना आम्ही एसटीचे (ST) तिकीट काढून देऊ शकतो.' असे म्हणत अजित पवारांना टोला लावला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कुणबी प्रमाणपत्राबाबत छगन भुजबळ न्यायालयात, आयोगाकडे आव्हान देऊ शकतात. त्यामुळे जरांगे म्हणाले, त्यानं कुणबीचे प्रमाणपत्रांना चॅलेंज करू देच. भारत देशात कोणाच्याच शासकीय नोंदी सापडल्या नाहीत. त्या मराठ्यांच्या सापडल्या आहेत. आणि भुजबळ म्हणतात चॅंलेज करू. आम्ही तुमचं चॅलेंज स्वीकारलचं नाही. आम्हाला गोर-गरिब ओबीसी बांधवांचे वाटोळे करायचं नाही. आमची नियत खराब नाही. तुम्ही आमच्या लेकरांचे नरडे दाबणार असाल, तर आमचा देखील नाईलाज राहिल.
"धनगर आणि वंजारी बांधव यांच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही. तरी याच्यामुळे काहींच्या डोक्यात घुसलेच. पण सर्वसामान्यांच्या लक्षात आले की हा राजकारणी माणूस आहे. तो स्वतःच्या फायद्यासाठी घुसला आहे. मराठा आणि ओबीसींचे गावखेड्यात संबंध आहेत. ते आम्ही टिकून ठेवणार आहे. त्याने किती वळवळ करू देत.", असे म्हणत छगन भुजबळांवर जरांगेंनी निशाणा साधला.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.