Uddhav Thackeray : भगवा कुर्ता, रुद्राक्षांची माळ; ठाकरेंनी नव्या लुकमधून विरोधकांना काय दिला मेसेज ?

Uddhav Thackeray Nashik Visit : रामकुंड परिसर शिवसेना कार्यकर्त्यांनी फुलून गेला होता.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Shivsena Nashik News : भगवा कुर्ता आणि हातात रुद्राक्ष अशा टिपिकल बाळासाहेब ठाकरे यांची आठवण करून देणाऱ्या लूकमध्ये उद्धव ठाकरे सोमवारी गंगा घाटावर आले. सहकुटुंब आणि राज्यभरातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ठाकरे यांनी गोदावरी आरती केली. यावेळी रामकुंड परिसर शिवसेना कार्यकर्त्यांनी फुलून गेला होता. विशेष म्हणजे ठाकरे यांनी सपत्नीक आरती करण्यापेक्षा पदाधिकाऱ्यांना आरती करण्याचा मान दिला.

हिंदुत्वाच्या मुद्यावरून भाजपकडून ठाकरे सतत लक्ष केले जातात. या पार्श्वभूमीवर ठाकरे काय संदेश देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांनी कोणताही संदेश न देता आपल्या वेशभूषेच्या माध्यमातून मी हिंदुत्वाचा असा संदेश दिला. त्यासोबतच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्भूमीवर शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्याकडे पाहिले गेले.

Uddhav Thackeray
Ayodhya Ram Mandir : देव ते देश आणि राम ते राष्ट्र; मंदिर निर्माणानंतर भारत विश्वगुरु हे टार्गेट

या दौऱ्यात राज्यव्यापी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर ठाकरे जाहीर सभेत आपली भूमिका मांडणार आहेत. दरम्यान सोमवारी संध्याकाळच्या वेळी ठाकरे, खासदार संजय राऊत, आदित्य ठाकरे, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासह काही स्थानिक पदाधिकारी काळाराम मंदिरात पूजेसाठी पोहचले.

यानंतर ठाकरे यांच्या उपस्थितीत रामकुंडावर आरती झाली. यावेळी राज्य भरातून आलेले शिवसैनिक रामकुंडावर हजर होते. पुरोहित संघाच्या पुरोहितांनी पूजा विधी केला. प्रचंड गर्दीमुळे शिवसैनिकांनी जल्लोष करीत घोषणाबाजी केली.

आरतीचा मान पदाधिकाऱ्यांना

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते काही दिवसांपूर्वी गोदावरी पूजन करण्यात आले होते. यावेळी मात्र ठाकरे यांनी बाजूला होत आरतीचा मान उपस्थित पक्ष पदाधिकाऱ्याना दिला. ठाकरे यांनी सपत्नीक आरती करायला हवी होती, अशी भावना काहींनी व्यक्त केली.

Uddhav Thackeray
Uddhav Thackrey : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचे उत्साही स्वागत; शिवसैनिकांनी केली मोठी गर्दी...

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com