Maratha Reservation Issue : छगन भुजबळांनी मंत्रिपदाचे संकेत मोडले?

Maratha followers deemand resignation of Chhagan Bhujbal-मराठा समाजाच्या आरक्षणाचे खरे विरोधक स्पष्ट झाल्याने नव्या पिढीचे डोळे उघडले.
Chhagan Bhujbal & Karan Gaikar
Chhagan Bhujbal & Karan GaikarSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation issue: राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ हे राज्याचे मंत्री आहेत. त्यांनी मंत्रिपद ग्रहन करताना निष्पक्षतेची शपथ घेतली आहे. मात्र, त्यांची भूमिका, विधाने यांचा विचार करताना, ते कुठेही निष्पक्ष आहेत, असे दिसून येत नाही, असा आरोप करण्यात आला आहे. (Maratha followers criticized Chhagan Bhujbal on reservation issue)

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) प्रश्नावर विविध समाजांसह ओबीसी (OBC) घटकांचादेखील मराठा समाजाला पाठिंबा आहे. मात्र, मंत्री भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मात्र ओबीसी कोट्यातून आरक्षणास विरोध केला आहे.

Chhagan Bhujbal & Karan Gaikar
Maratha Reservation : "भुजबळांचं भडक वक्तव्य", शंभूराज देसाई मुख्यमंत्र्यांना भेटणार; मंत्रिमंडळ बैठकीत वादाची चिन्हे

मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास मंत्री छगन भुजबळ यांचा विरोध आहे. हे आता सूर्य प्रकाशाइतके स्वच्छ झाले आहे. हा विरोध अनाठायी आहे. केवळ राजकीय सोयीसाठी ते सातत्याने याबाबतची विधाने करीत आहेत.

कुणबी आणि मराठा हे एकच आहेत, त्याचे हजारो पुरावे देण्यात आला आहे. कुणबी हे ओबीसी आहेत, हे न्यायालयानेदेखील स्पष्ट केले आहे. असे असताना राज्य सरकारने याबाबत घेतलेल्या निर्णयांना, विशेषत: मुख्यमंत्री आणि सबंध मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे. एकीकडे भुजबळ यांनी याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाच्या ज्या बैठकीत हा निर्णय झाला, त्यात कोणताही वाद झालेला नाही, असे त्यांनी सांगितले होते.

याबाबत मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर यांनी टीका केली आहे. याबाबत नाशिक जिल्ह्यात जनजागृती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. भुजबळ यांच्या सभोवताली घुटमळणाऱ्या मराठा समाजाच्या नेत्यांनी अजूनही शहाणे व्हावे, अशी सार्वत्रिक भावना आहे. भुजबळ यांनी मंत्रिपदाची जी शपथ घेतली होती, त्याचे स्मरण करून निष्पक्ष भूमिका घ्यावी, अन्यथा राजीनामा द्यावा, असे गायकर म्हणाले.

Chhagan Bhujbal & Karan Gaikar
Gram Panchayat Election 2023 Result : सांगलीत भाजपने गुलाल उधळला; पण पालकमंत्र्यांच्या पॅनेलचा धुव्वा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com