Maratha Reservation : "भुजबळांचं भडक वक्तव्य", शंभूराज देसाई मुख्यमंत्र्यांना भेटणार; मंत्रिमंडळ बैठकीत वादाची चिन्हे

Maratha Reservation Issue Shambhuraj Desai On Chhagan Bhujbal : मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसींचे आरक्षण संपवण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप मंत्री छगन भुजबळांनी केला. त्यावर मंत्री शंभूराज देसाईंनी आक्षेप घेतला आहे...
Chhagan Bhujbal, Shambhuraj Desai
Chhagan Bhujbal, Shambhuraj DesaiSarkarnama

Maratha Reservation Issue In Maharashtra : जुने पुरावे तपासून कुणबी नोंदी असलेल्यांना कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने घेतला आहे. पण मंत्री छगन भुजबळ यांनीच सरकारविरोधी भूमिका घेतल्याने संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. आता शिंदे गटातील मंत्री शंभूराज देसाई यांनीही भुजबळांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. आणि भुजबळांनी केलेलं वक्तव्य हे चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.

Chhagan Bhujbal, Shambhuraj Desai
Maratha Reservation : "मराठ्यांविरोधात काही OBC नेत्यांचं षडयंत्र"; भुजबळांच्या आरोपांवर जरांगे पाटील थेट बोलले...

आम्हाला ओबीसी आणि इतर कुठल्याही समाजाचं आरक्षण काढून मराठा समाजाला द्यायचं, असं अजिबात नाही. छगन भुजबळ यांनी विनाकारण अशा प्रकारे जो संभ्रम निर्माण केला आहे तो चुकीचा आहे. आणि उद्या मंत्रिमंडळाची बैठक होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी जम्मू-काश्मीर सीमेवर गेले आहेत. ते आल्यानंतर शक्य झाल्यास आज आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ. शक्य न झाल्यास उद्या मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी आम्ही सर्व जे काही मंत्री आहेत ते आपली भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगू, असं मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ओबीसींचं आरक्षण संपवण्याचा घाट घातला जातोय, हे भुजबळांचं वक्तव्य संभ्रम निर्माण करणारं आहे. ओबीसींचं आरक्षण काढून कुणाला दिलं जणार आहे, असं भासवायचं आणि माझ्यामुळे तुमचं जाणारं आरक्षण वाचलं, असा काही त्यांचा प्रयत्न चाललाय का?, असा सवाल करत शंभूराज देसाईंनी शंका उपस्थित केली आहे.

मराठा आरक्षणाचा इतका मोठा विषय मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यवस्थित हाताळला. जरांगे पाटील यांच्याकडून दोन महिन्यांची मुदत घेतली. आता कायद्याच्या चौकटीत बसणारं हे आरक्षण देण्याचा प्रयत्न होत आहे. आणि अशा परिस्थिती एकदम संभ्रम निर्माण करणारं वक्तव्य भुजबळांनी केलं आहे. आमची याबाबतीतली जी भूमिका आहे ती आम्ही मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांकडे मांडू, असं शंभूराज देसाईंनी स्पष्ट केलं.

सरकारनेच माजी न्यायमूर्तींना जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी पाठवलं. आणि सरकारमधीलच मंत्र्याने त्यांच्या भेटीवर आक्षेप घ्यावा, हे चुकीचं आहे. ओबीसींच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही. मुख्यमंत्री शिंदे यांनी हे अनेकदा स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे भुजबळांनी अशा प्रकारे वक्तव्य करून महाराष्ट्रात जाती-जातींमध्ये संभ्रम निर्माण करू नये, असं आवाहन शंभूराज देसाई यांनी केलं आहे.

भुजबळ हे वरिष्ठ मंत्री आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांची वेळ घ्यावी आणि त्यांच्याकडे आपली भूमिका मांडावी. असं माध्यमांसमोर जाऊन भडक वक्तव्य करू नये. भुजबळांची ही जुनीच सवय आहे. आणि परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये, असा टोलाही शंभूराज देसाई यांनी लगावला आहे.

Chhagan Bhujbal, Shambhuraj Desai
Manoj Jarange On Fadnavis : " ते चौकटीच्या बाहेरचं काही बोलले नाहीत, मी पण..."; फडणवीसांच्या फोनवरून जरांगेचं मोठं विधान

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com