Maratha Reservation Issue: मुख्यमंत्र्यांना जमले नाही, ते धाडस विखे पाटील यांनी दाखवले!

Maratha OBC dispute, Shivsena MP Vinayak Raut criticized State Government-मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर छगन भुजबळ यांना रोखायला हवे होते, असे शिवसेना खासदार विनायक राऊत म्हणाले.
Chhagan Bhujbal, Radhakrishna Vikhe Patil & Vinayak Raut
Chhagan Bhujbal, Radhakrishna Vikhe Patil & Vinayak RautSarkarnama
Published on
Updated on

Shivsena on Chhagan Bhujbal: राज्यात मराठा आरक्षणाच्या विषयावर काही मंत्रीच तेढ निर्माण करीत आहेत, अशी टीका शिवसेना नेते, खासदार विनायक राऊत यांनी आज छगन भुजबळ यांचे नाव न घेता केली. (Vinayak Raut criticized CM Eknath Shinde as well Chhagan Bhujbal on Maratha Reservation)

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) प्रश्नावर शिवसेनेने (Shivsena) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका केली. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) राज्यात जातीय तेढ निर्माण करीत आहेत, त्यांना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी खडसावले हे बरे केल्याचे ते म्हणाले.

Chhagan Bhujbal, Radhakrishna Vikhe Patil & Vinayak Raut
Maharashtra Politics : जोर, बैठका बावनकुळेंच्या; खासदारकीची स्वप्ने दादा भुसे यांची!

शिवसेना नेते विनायक राऊत यांनी आज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या व्यथा ऐकल्या. याबाबत भरपाईचा निर्णय होत नाही, तोपर्यंत प्रशासनाला स्वस्थ बसू देणार नाही, असा इशारा त्यांनी या वेळी दिला.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्याचे मुख्यमंत्री दोन वेगवेगळ्या भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. एकीकडे ते मराठा समाजाच्या आंदोलकांना आरक्षणासाठी वेळ देण्याची विनंती करतात. त्यावर प्रशासन काम करीत असतानाच, ते छगन भुजबळ यांच्या भूमिकेचेही समर्थन करतात. हे कसे होऊ शकते?.

Chhagan Bhujbal, Radhakrishna Vikhe Patil & Vinayak Raut
Congress Politics : बाळासाहेब थोरातांना सरकारविरोधात मोठा मुद्दा मिळाला!

राज्याच्या मंत्रिमंडळात असूनदेखील भुजबळ वेगळी भूमिका घेतात. वाद निर्माण होईल, अशी विधाने सतत करीत राहतात. मराठा आंदोलकांना चिथावणी देतात. मंत्रिमंडळातील सहकारी असे कसे बोलू शकतो. त्याला रोखण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी करायला हवे होते. मात्र, तेवढी हिंमत मुख्यमंत्री शिंदे यांच्यात नाही. ते धाडस महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी करून दाखवले. विखे पाटील यांनी भुजबळ यांना खडसावले आहे. त्यासाठी त्यांचे काैतुक केले पाहिजे.

राज्यातील सत्ताधारी पक्षातील गटातटाच्या राजकारणावरदेखील राऊत यांनी अतिशय परखड टीका केली. `सत्तेत सहभागी असलेला गद्दारांचा मिंधे गट भारतीय जनता पक्षाला जे जे हवे ते ते सर्व करीत आहे. भाजपच्या फायद्याचे काम करीत आहे. त्यांच्याच इशाऱ्यावर चालत आहे. ज्यांच्याविषयी राज्यातील जनतेच्या मनात संताप आहे, ते भाजपच्या प्रचारासाठी अन्य राज्यांच्या निवडणुकीत जातात. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिंदे गटाने इतर राज्यात जाऊन प्रचार केला आहे. लोकांनी तिथंदेखील यांचा धिक्कारच केल्याचे ते म्हणाले.

Chhagan Bhujbal, Radhakrishna Vikhe Patil & Vinayak Raut
Maratha Reservation : सर्वात मोठी बातमी | सरकार आरक्षणाची मर्यादा वाढवण्याच्या तयारीत? मराठा आरक्षणावर तोडगा निघाला?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com