Maratha Reservation Politics : सकल मराठा समाजाचा वाजेंना पाठिंबा

Nashik Loksabha Election 2024 : नाशिक मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. त्याचबरोबर दिंडोरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे भास्करराव भगरे यांना पाठिंबा देण्याची घोषणा करण्यात आली.
Nashik Loksabha Election 2024
Nashik Loksabha Election 2024Sarkarnama

Nashik constituency News: सकल मराठा समाजाने आज मोठा निर्णय घेतला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर गोळीबार आणि 'एसआयटी'ची चौकशी करणाऱ्यांना पराभूत करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

सकल मराठा समाजातर्फे पत्रकार परिषदेत भूमिका जाहीर करण्यात आली. यावेळी नाशिक मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. त्याचबरोबर दिंडोरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे भास्करराव भगरे (Bhaskarrao Bhagare) यांना पाठिंबा देण्याची घोषणा करण्यात आली.

सकल मराठा समाजाच्या या निर्णयाने वंचित बहुजन आघाडीचे करण गायकर आणि शिवसेना एकनाथ शिंदे (Shivsena) गटाच्या खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांना मोठा धक्का बसला आहे. गायकर हे स्वतःला मराठा आरक्षणाचे पदाधिकारी म्हणून घोषित केले आहे. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरच वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) त्यांना उमेदवारी दिली होती. आपल्या प्रचारातही ते सातत्याने मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाचा उल्लेख करीत असतात.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nashik Loksabha Election 2024
Bhiwadi Lok Sabha 2024: बाळ्या मामा ही कपिल पाटलांची बी टीम; शरद पवारांनी काँग्रेस संपवण्याची सुपारी घेतली!

मात्र त्यांनी आपली उमेदवारी करताना कोणालाही विश्वासात घेतलेले नव्हते. व्यक्तिगत राजकीय धोरणाचा भाग म्हणून त्यांनी उमेदवारी केली होती, असे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे किरण गायकर (Kiran Gaikar) यांना सकल मराठा समाजाच्या निर्णयाने आज मोठा धक्का बसला आहे.

सकल मराठा समाजाने नाशिक (Nashik) शहरात आरक्षणासाठी उपोषण केले होते. या उपोषणात कोणताही नेता सहभागी झाला नाही. उपोषण स्थळी येऊन त्यांनी पाठिंबाही दिला नाही. त्याबद्दल आज पुन्हा सकल मराठा समाजाने राजकीय नेत्यांवर टीका केली.

यावेळी पदाधिकारी म्हणाले, जनतेच्या मनात विद्यमान सरकारबद्दल तिरस्काराची भावना आहे. या सरकारने गरीब आणि सामान्य मराठा समाजासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचा घेतला हा निर्णय अतिशय वाईट होता. आरक्षण मिळावे यासाठी शांततेने 105 दिवस आंदोलन सुरू होते. त्या आंतरवाली सराटी (Maratha Reservation) येथील आंदोलकांवर गोळीबार करून अमानुष त्रास देण्यात आला. त्याचा संताप येत्या निवडणुकीत मतदानातून व्यक्त करण्याचा समाजाचा कल आहे, असे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी प्राचार्य हरीश अडके, चंद्रकांत बनकर, डॉ सचिन देवरे, हिरामण वाघ, नितीन काळे, नितीन रोटे पाटील, अनिल आहेर, राजेंद्र शेळके, सुभाष शेळके यांचा विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Nashik Loksabha Election 2024
Maharashtra Political News : इतके सारे होऊनही भाजप पुन्हा पवार, ठाकरे यांचे पक्ष फोडणार? 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com