Maratha Reservation : चलो मुंबई... जे सहकार्य करणार नाहीत, त्यांच्यावर बहिष्कार; मराठा समाजाचा नेत्यांना इशारा

Maratha Reservation In Maharashtra Chalo Mumbai News : 'चलो मुंबई'च्या नियोजनासाठी झालेल्या बैठकीत घरोघरी जनजागृती करण्याचा निर्धार...
Maratha Reservation
Maratha Reservation Sarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation Protest Latest News : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी येत्या 20 जानेवारीला मुंबईला जाण्याचा निर्धार धुळे येथील कार्यकर्त्यांनी केला. यासाठी मराठा समाजाचे जे नेते याबाबत सहकार्य करणार नाहीत, त्यांच्यावर बहिष्कार घालण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

मराठा समाजाचे जे कुणी राजकीय नेते असतील. नगरसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, आमदार, भावी आमदार, खासदार व इच्छूक उमेदवार असतील त्यांनी आरक्षण लढ्याबाबत मराठा समाजाला मदत करावी. 20 जानेवारीच्या `चलो मुंबई`त मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे. Aarakshan आरक्षण संदर्भात मदतीसाठी समाजबांधव अधिकाधिक संख्येने सहभागी होतील, याबाबत योग्य ते नियोजन करण्यावर भर देण्याचे ठरले.

Maratha Reservation
Raju Patil: जरांगेंना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं असतं, तर ही वेळ आली नसती!

जो कुणी मराठा समाजाचा राजकीय व्यक्ती मदत करणार नाही, त्यास निवडणुकीवेळी मदत करू नये. त्यांना मतदान करू नये, त्याच्यावर बहिष्कार टाकावा, असा निर्णय बैठकीत झाला.

'चलो मुंबई'चा नारा जरांगे-पाटील यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर धुळे सकल मराठा समाजातर्फे बैठक झाली. यात जिल्ह्यात ठिकठिकाणी जनजागृती करणे, बैठका घेणे, आरक्षण लढ्याबाबत प्रचार- प्रसार करणे, मराठा समाज बांधवांच्या घरोघरी पोहोचणे व जागृती करणे, जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामीण भागातही बैठकांद्वारे 20 जानेवारीबाबत प्रचार व प्रसार करण्याचा निर्णय झाला. मराठा आरक्षणासाठी जो मदत करेल, त्याच व्यक्ती किंवा उमेदवाराला समाधानाने मदत करायची आहे, असे ठरवण्यात आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आरक्षणाच्या लढाईत स्वतःला वाहून घेणाऱ्या राजकीय व्यक्तींना समाजाने सहकार्य करायचे आहे, असे बैठकीत ठरले. तसेच दहा ते पंधरा हजार समाज बांधवांची मुंबईला जाण्यासाठी व्यवस्था करावी. त्यात बैलगाडी, ट्रॅक्टर, ट्रक, आयशर, मिनी ट्रक, तसेच रुग्णवाहिका, पाणी टँकर आदी वाहने, किराणा, तांदूळ, गहू, तेल किमान पंधरा दिवस पुरेल, अशा पद्‌धतीने सोबत ठेवावे. यात बिछाना, थंडीमुळे स्वेटर, हातमोजे, पायमोजे, औषधे सोबत ठेवावीत, असे आवाहन जिल्ह्यातील समाज बांधवांना करण्यात आले.

Edited by Sachin Fulpagare

Maratha Reservation
Maratha Reservation : येवल्यातील मराठा आंदोलकांवरील गुन्ह्यांचे प्रकरण गेले थेट फडणवीसांकडे!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com