
Maharashtra Political News : हैदराबाद गॅजेटच्या आधारे धनगर व बंजारा समाजाला आदिवासी समाजातून आरक्षण मिळावं अशी मागणी सध्या होत आहे. परंतु शिवसेनेचे अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आदिवासी आमदार आमश्या पाडवी यांनी या मागणीला विरोध केला आहे. मी जोपर्यंत आमदार आहे, तोपर्यंत आदिवासी आरक्षणात कुणालाही घुसू देणार नाही. तशी वेळ आली तर सरकारमधून बाहेर पडेल अशी भूमिका त्यांनी जाहीर केली आहे.
आमदार आमश्या पाडवी यांनी जाहीर केलेल्या याच भूमिकेचा राग मनात धरुन एका माथेफिरूने व्हिडिओच्या माध्यमातून आमदार आमश्या पाडवी यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करीत त्यांना शिवीगाळ केली. हा व्हिडीओ अनेक ठिकाणी व्हायरल झाला. त्यानंतर आता आदिवासी समाजाने संतप्त होत याचा निषेध नोंदवला आहे.
शिवसेना आमदार आमश्या पाडवी यांना झालेल्या शिवीगाळनंतर आदिवासी समाजात संतापाची लाट उसळली असून नंदुरबार जिल्ह्यातील विविध आदिवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत. पाडवी यांना शिवीगाळ करणाऱ्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून विविध कलमान्वये फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा. अन्यथा आदिवासी समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा बिरसा क्रांती दलातर्फे देण्यात आला आहे. तसे निवेदन राज्याचे मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील धनगर व बंजारा समाजातील काही तथाकथित मंडळी ही धनगर व बंजारा समाजाला आदिवासी समाजात आरक्षणाची मागणी करीत आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील पत्रकारांनी आमदार आमश्या पाडवी यांना आरक्षणाबाबत त्यांची भूमिका विचारली असता त्यावर सरकारने आदिवासी समाजात इतर समाजाला आरक्षण देऊ नये व दिल्यास सरकारमधून बाहेर पडेल, असे आमश्या पाडवी यांनी स्पष्ट केले होते. परंतु याचा राग आणि द्वेष मनात धरून घनश्याम बापू नावाच्या एका माथेफिरूने एका व्हिडिओच्या माध्यमातून आमदार आमश्या पाडवी यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करीत त्यांना ऐकरी भाषेत शिविगाळ केली आहे.
आदिवासी समाजबांधवांनी या माथेफिरूचा जाहीर निषेध केला आहे. सदर व्यक्तीने हेतुपुरस्कर आमदार आमश्या पाडवी यांच्या विरोधात विखारी वक्तव्य करत त्यांना शिवीगाळ केली आहे. त्यामुळे सामाजिक वातावरण खराब करू इच्छिणाऱ्या अशा व्यक्तीवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून विविध कलमांन्वये फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा. अन्यथा आदिवासी समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा बिरसा क्रांती दलाने दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.