Chhagan Bhubal news : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आज येवल्यात पाहणी दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्याला सकल मराठा समाजाचा विरोध असल्याने विंचूर चौफुली येथे आंदोलक जमले होते. मात्र मंत्री भुजबळ यांनी आंदोलकांना हुलकावणी दिली. (Maratha Community folloers opposed Bhujbal`s visit to farmers)
श्री. भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज सकाळी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागाचा पाहणी दौरा सुरू केला. यावेळी पोलिसांचा (Police) मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मराठा समाजाने (Maratha) त्यांच्या मार्गावर रास्ता रोको करण्याची तयारी केली होती.
मंत्री भुजबळ यांना येवल्यातील काही शेतकऱ्यांनी काल रात्रीच दुरध्वनी करून आपण आमच्या गावांना भेटी देऊ नये. आम्ही सर्व एकमताने तसा निर्णय घेतला आहे, असे कळवले होते. मात्र श्री. भुजबळ यांना देखील विरोध होईल हे अपेक्षित असल्याने विरोधाला सामोरे जाण्याची त्यांची मानसिकता होती.
चार लोकांनी एकत्र येऊन ठराव केला, तर तो सबंध गावाचा ठराव होतो का? असे त्यांनी दुरध्वनी करणाऱ्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्याला सुनावले होते. त्यामुळे आज सकाळी त्यांचा दौरा कसा होतो. याची उत्सुकता होती. श्री. भुजबळ यांच्या समर्थकांनी देखील त्यांना मतदारसंघातील विरोध, कार्यकर्ते, आंदोलन, राजकीय चर्चा याबाबत सतत माहिती देऊन सावध केले होते.
हा दौरा सुरू झाल्यावर श्री. भुजबळ यांनी काही शेतकऱ्यांच्या द्राक्षबागांची पाहणी केली. ही पाहणी देखील शासकीय अधिकारी, पोलिस तसेच मीडियाच्या गराड्यातच झाली. पोटादा येथून हा वाहनांचा ताफा अतीशय वेगात निघून गेला. गावात कोणीही थांबले नाही, असे ग्रामस्थांनी सांगितले.
आज सकाळी लवकर येऊन भुजबळ यांनी आपला दौरा सुरू केला. येवला विंचुर चौफुलीवर मराठा समाजाचे कार्यकर्ते भुजबळ यांचा निषेध करण्यासाठी जमले होते. याची माहिती पोलिसांनी त्यांना दिली. त्यानंतर पोलिसांच्या सुचनेवरूनच वाद टाळण्यासाठी भुजबळ अंगणगाव मार्गे आपल्या पाहणी दौऱ्यासाठी निघून गेले. त्यामुळे सकाळी होणारा वाद टळला. अर्थात सोमठानदेश व अन्य भागातील नागरिकांत संताप कायम असल्याने दौऱ्याचा शेवटी काय होते, याची उत्सुकता कायम आहे. पोलिस यंत्रणा देखील त्यामुळे तणावात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.