Hemant Patil : मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणाऱ्या खासदारांना राष्ट्रपतींकडून समन्स

President Draupadi Murmu News : हेमंत पाटलांनी तात्काळ लोकसभा अध्यक्षांच्या नावाने राजीनामा लिहून दिला होता.
Hemant Patil, Draupadi Murmu
Hemant Patil, Draupadi Murmu Sarkarnama
Published on
Updated on

Hingoli Hemant Patil Resignation : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील (MP Hemant Patil) यांनी राजीनामा दिला होता, त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी समन्स पाठवले आहे.चार डिसेंबर रोजी संसदेत हजर राहण्याचे समन्स राष्ट्रपतींनी पाठवले आहे.

Hemant Patil
Hemant PatilSarkarnama

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे हेमंत पाटलांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. तेव्हापासून हेमंत पाटील संसदेच्या कुठल्याही कामकाजात उपस्थित नाहीत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवतींनी त्यांना हे समन्स पाठवल्याचे समजते.

काही दिवसापूर्वी मराठा समाजातील काही आंदोलक त्यांच्या भेटीसाठी गेले असता त्या ठिकाणी आंदोलकांनी खासदारकीचा राजीनामा द्या अशी मागणी केली. त्यानंतर हेमंत पाटलांनी तात्काळ लोकसभा अध्यक्षांच्या नावाने राजीनामा लिहून दिला होता.

यवतमाळच्या पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखाना येथे पाटील आले असता त्यांना मराठा आंदोलकांनी घेराव घातला. यावेळी आमदार खासदारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Hemant Patil, Draupadi Murmu
Mehul Choksi : मेहुल चोक्सीला न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला; बँकेने फ्लॅट अन् बंगला घेतला ताब्यात

मराठा आरक्षणप्रश्नी आपण दिल्ली येथे खासदारांची बैठक बोलाविली मात्र मराठा बांधवांची मागणी असेल तर एक मिनिटात राजीनामा देतो असे खासदार पाटील यांनी यावेळी सांगितले होते.

त्यांनी लगेचच लोकसभा अध्यक्षांच्या नावे आपला राजीनामा लिहिला होता.हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर हेमंत पाटील हे निवडून गेले आहेत. मराठा आरक्षणासाठी एखाद्या आमदार वा खासदाराने दिलेला हा पहिलाच राजीनामा आहे.

Hemant Patil, Draupadi Murmu
Thackeray Group: ठाकरेंनी फुटीरांविरुद्ध रान पेटवले, मात्र 'टेम्पो' टिकवण्याचे आव्हान...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com