Solapur News: 'भावपूर्ण श्रद्धांजली सिंघम' फेसबूक पोस्टकरून पोलिसाने स्वत:वरच झाडल्या तीन गोळ्या...

Solapur Jail Police: सोलापूर शहरातील जिल्हा कारागृहात ते गार्ड म्हणून सेवेत आहेत.
Solapur Jail Police Vikas Kolpe
Solapur Jail Police Vikas KolpeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Solapur : वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून मानसिक खच्चीकरण झाल्याचे सांगून सोलापूर येथील जिल्हा कारागृहात एका पोलिस कर्मचाऱ्याने कारागृहाच्या प्रवेशद्वारावर स्वतःवरच तीन गोळ्या झाडून घेतल्या. या घटनेने सोलापूर पोलिस दल हादरलं आहे.

विकास गंगाराम कोळपे असे या पोलिसाचे नाव असून त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे. सोलापूर शहरातील जिल्हा कारागृहात ते गार्ड म्हणून सेवेत आहेत.

विकास कोलपे यांनी स्वत:वर गोळ्या झाडून घेण्यापूर्वी फेसबूकवर जन्म आणि मृत्यूची तारीख टाकून 'भावपूर्ण श्रद्धांजली सिंघम' असे नमूद केले आहे. यात वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून मानसिक खच्चीकरण झाल्याचे त्यांनी म्हटलं आहे. दोन महिन्यातील ही तिसरी घटना आहे. गोळ्या झाडून घेतलेल्या विकास यांच्यावर अतिदक्षता विभागात युद्धपातळीवर उपचार सुरु आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Solapur Jail Police Vikas Kolpe
Tukaram Supe News : तुकाराम सुपेंकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड...

विकास कोलपे हे मूळचे पुणे जिल्ह्यातील देवाची आळंदी येथील रहिवासी आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांची सोलापुरातील जिल्हा कारागृहात बदली झाली होती. त्यांनी यापूर्वी २०१३ मध्ये कोल्हापूर, २०१६ येरवडा कारागृह (पुणे), २०१७ अहमदनगर, २०१९ सांगली आणि २०२१ मध्ये सोलापूर जिल्हा कारागृहात मुख्य प्रवेशद्वारात गार्ड म्हणून कार्यरत होते. त्यांनी स्वतःजवळील एसएलआर बंदुकीतून स्वतःवर तीन गोळ्या झाडून घेतल्या.

Solapur Jail Police Vikas Kolpe
Manoj Jarange: जरांगेंनी भुजबळांना करून दिली जेलवारीची आठवण...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Solapur Dcc Bank Sabha
Devendra Fadnavis-rajan patil-rajendra raut
Solapur DCC Bank Election
BJP Leader Meeting
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com