Maratha Reservation issue : राज्यभर समाज जागरूक आणि संघटीत झाल्याने आरक्षणाच्या मागणीला गती आलीआहे. आपल्याला आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे त्यात अडथळे उभे करण्यासाठी काही टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. त्यामुळे गाफील राहू नका, असा कानमंत्र मनोज जरांगे पाटील यांनी मराठा युवकांना दिला. (Huge Response for Manoj Jarange Patil`s Public Meetings in Dhule as well Jalgaon)
मनोज जरांगे-पाटील यांनी जळगाव, (Jalgaon) धुळ्याच्या (Dhule) सभेत मराठा (Maratha) समाजाच्या युवकांनी गाफील राहू नये असे आवाहन केले. यावेळी त्यांनी राज्य शासनाच्या (Maharashtra Government) स्तरावर आरक्षणाबाबतचे कामकाज अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले.
धुळे आणि जळगाव जिल्ह्यांचा दौरा जरांगे पाटील यांनी केला. या दौऱ्यात त्यांच्या चार सभा झाल्या. यावेळी गिरीश महाजन आणि छगन भुजबळ या मंत्र्यांवर त्यांनी टीका केली. त्यांनी आपण मंत्रिपदाची शपथ घेतली आहे, याची जाणीव ठेवावी असे सांगितले.
या दौऱ्यात त्यांचे अतिशय उत्साहाने ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. अनेक ठिकाणी युवकांनी आरक्षणाच्या घोषणा देत त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला.
या दौऱ्यात जळगाव येथे झालेल्या सभात त्यांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलला बाजूला ठेवत वेगळी मांडणी केली. ते म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण कुणी घरी आणून देणार नाही, त्यासाठी मेहनत करावी लागणार आहे. मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून अनेक जण षडयंत्र करीत आहेत. टोळ्या मराठ्यांच्या विरोधात आल्या, तरी मराठे पुरुन उरतील. कोणी काही केले तरी चिंता करू नका.
जरांगे पाटील यांनी राज्य सरकार करीत असलेल्या कामाविषयी समाधान व्यक्त करीत, मराठा समाजाच्या एकजुटीमुळे आपले आरक्षण आता अंतिम टप्प्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यात साडेतीन लाख नोंदी सापडल्या आहेत. आरक्षण मिळाले तर आयुष्याची भाकरी मिळणार आहे. मी मराठ्यांच्या लेकरांसाठी जिवाची बाजी लावली. आता ही संधी असून, संधीचे सोने करा, असे सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.