Congress News : शिंदे, फडणवीस सरकार शब्द का पाळत नाही?

Maratha Reservation issue, State Government not keeping word-आमदार कुणाल पाटील म्हणाले, राज्यातील सरकार पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत आरक्षण देईल, असे बोलले होते.
MLA Kunal Patil
MLA Kunal PatilSarkarnama
Published on
Updated on

Maratha reservation News : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सत्तेत आलेल्या या सरकारने मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मराठा समाजाला आरक्षण देऊ, असे आश्वासन दिले होते. सत्तेत आल्यावर हे सरकार आपलाच शब्द विसरले का?, असा प्रश्न आमदार कुणाल पाटील यांनी केला आहे. (Congress MLA Kunal Patil given support to Maratha Reservation)

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) धुळे (Dhule) येथे आक्रमक पद्धतीने आंदोलन करण्यात आले आहे. त्यामुळे वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे (Congress) आमदार कुणाल पाटील यांनी राज्य सरकारला इशारा (Maharashtra Government) दिला आहे.

MLA Kunal Patil
Nirmala Sitaraman : लंडनमध्ये सेल्सगर्ल'ची नोकरी ते भारताच्या अर्थमंत्री, असा आहे निर्मला सीतारामन यांचा प्रवास?

धुळे शहरात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर रास्ता रोको, धरणे आंदोलन, उपोषण तसेच कँडल मार्चसह विविध प्रकारे आंदोलन झाले आहे. त्यात विविध राजकीय पक्ष सहभागी आणि संघटना सहभागी झाले आहेत. त्यामुळे या प्रश्नावर राजकीय वातावरण तापले आहे. या विषयावर निर्नायकी स्थिती आहे.

यासंदर्भात काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांनी आंदोलकांची भेट घेतली. त्यात त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्यात आमचे सरकार येऊ द्या, पहिल्या कॅबिनेट बैठकीतच मराठा समाजाला आरक्षण देऊ, असा शब्द विद्यमान राज्य सरकारने दिला होता. आता सरकारने हा शब्द पाळावा, मराठा समाजाचा अंत पाहू नये, असा इशारा त्यांनी दिला.

आमदार कुणाल पाटील यांनी केली. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी धुळ्यातही सुरू असलेल्या साखळी उपोषण आंदोलनाच्या ठिकाणी आमदार पाटील यांनी भेट देत पाठिंबा दिला. आरक्षण मागणीचे मुख्यमंत्र्यांना दिलेले पाठिंब्याचे पत्र आंदोलकांना सुपूर्त केले.

मोदी यांचा चकार शब्द नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच शिर्डीला येऊन गेले. मात्र, मराठा आरक्षणावर एकही शब्द ते बोलले नाहीत ही शोकांतिका आहे. मराठा समाजाच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम केले जात आहे. मनोज जरांगे यांनी सरकारला चाळीस दिवसांची मुदत दिली होती. या चाळीस दिवसांत मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून राज्य सरकारचा एकही प्रतिनिधी केंद्र सरकारकडे आरक्षणासाठी गेला नाही. राज्य सरकारने केंद्राकडे जाऊन आरक्षणाचा अध्यादेश काढून आणणे गरजेचे होते. मात्र, तसे काहीही झाले नाही, याचा उल्लेख या वेळी आमदार पाटील यांनी केला.

MLA Kunal Patil
Ajit Pawar : दौंड शुगर; अजितदादांबाबत मराठा आंदोलकांचा मोठा निर्णय...

या वेळी बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील, खरेदी-विक्रीचे अध्यक्ष लहू पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य पंढरीनाथ पाटील, अशोक सुडके, बाजार समितीचे संचालक कुणाल पाटील, हृषीकेश ठाकरे, माजी सभापती गुलाबराव पाटील, बापू खैरनार, सागर पाटील, मधुकर पाटील, आनंदा पाटील, हर्शल साळुंके, हरीश पाटील, संदीप पाटील आदींसह मोठ्या संख्येने विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

MLA Kunal Patil
Maratha Reservation : PM मोदी, अमित शहांना महाराष्ट्र पेटवायचा आहे का?; जरांगेंच्या प्रकृतीवरून राऊतांचा घणाघात

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com