Manoj Jarange Hunger Strike : सर्व जाती धर्मातील नागरिकांनी दिला पाठिंबा!

Maratha reservation issue, various casts support Maratha issue-साक्री येथे सुरू केलेल्या उपोषणात सर्व जाती-समाजांतील नागरिकांनी तहसीलदारांना निवेदन देत दिला पाठिंबा
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Maratha reservation News : मराठा आरक्षणाचे आंदोलन आता राज्यभर सुरू झाले आहे. ते केवळ एका समाजाचे आंदोलन राहिलेले नाही. त्याला विविध जातींच्या नागरिकांनीही पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे. (Maratha agitation in Sakri is spreading in Rural areas too)

साक्री (धुळे) (Dhule) येथे सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी सुरू झालेल्या आंदोलनाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. त्याला विविध जाती धर्माच्या नागरिकांनी पाठिंबा दिल्याने प्रशासनापुढे (Maharashtra Government) पेच निर्माण झाला आहे.

Manoj Jarange Patil
Congress News : शिंदे, फडणवीस सरकार शब्द का पाळत नाही?

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी (जालना) येथे मनोज जरांगे-पाटील यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. दुसऱ्या टप्प्यातील हे आंदोलन ग्रामीण भागात अतिशय वेगाने पसरत आहे. त्याबाबत प्रारंभी मराठा समाजातील काही राजकीय नेत्यांनी आक्षेप नोंदवत गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.

मात्र, साक्री (धुळे) येथे सुरू झालेल्या आंदोलनाचे स्वरूप व त्याला मिळालेला प्रतिसाद मराठा आरक्षणाबाबत प्रश्न निर्माण करणाऱ्यांना चोख उत्तर देणारा ठरला आहे. साक्री शहरातील विविध जाती धर्माच्या नागरिकांनी या आंदोलोनात सहभाग नोंदवला. त्यामुळे मराठा आरक्षणाला अन्य घटकांचादेखील पाठिंबा मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

यासंदर्भात तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना निवेदन देण्यासाठी जमलेल्या अन्य जाती धर्माच्या नागरिक थेट उपोषणातदेखील सहभागी झाले. महाराष्ट्रात सुरू असलेले हे आंदोलन शांततेत सुरू राहिले पाहिजे. याबाबत मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी आम्ही ही भूमिका घेतल्याचे या वेळी नागरिकांनी सांगितले. त्यामुळे प्रशासनापुढेदेखील नवा प्रश्न निर्माण झाला आहे.

सकल मराठा समाज साक्री तालुक्यातर्फे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देऊन बुधवारपासून लाक्षणिक उपोषण करीत शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. उपोषणाला सर्वपक्षीय पदाधिकारी, तसेच शहरातील सर्व जाती-समाजांतील नागरिकांनी पाठिंबा दर्शविला.

Manoj Jarange Patil
Maratha Reservation : PM मोदी, अमित शहांना महाराष्ट्र पेटवायचा आहे का?; जरांगेंच्या प्रकृतीवरून राऊतांचा घणाघात

साखळी उपोषणात किशोर वाघ, हिंमत सोनवणे (गोसावी), केशव शिंदे, भूषण माळी, बंडू गिते (वंजारी), कमलेश पाटील, इंजि. देशमुख, जयेश सोनवणे, किरण दहिते, पंजाबराव गांगुर्डे, श्रीकांत भोसले, रमेश सरक, माजी खासदार बापू चौरे, आबासाहेब सोनवणे, विजय भोसले, बाबा पठाण, जी. टी. मोहिते, भानुदास गांगुर्डे, जगदीश शिंदे, कल्पेश सोनवणे, शीतल सनेर, जितेंद्र मराठे, गिरीश नेरकर, सचिन सोनवणे, चंद्रकांत देसले, अरुण अहिरराव आदी सहभागी झाले.

Manoj Jarange Patil
बघा कडू आणि जरांगेंमध्ये काय घडला संवाद | Bachchu Kadu On Manoj Jarange

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com