Manoj Jarange Patil News: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे उद्या मुंबईत आंदोलन होत आहे. हे निर्णय आंदोलन असल्याने नाशिक जिल्ह्यातून त्याला मोठा पाठिंबा मिळत आहे. यानिमित्ताने मराठा समाजाच्या सर्व संघटना एकत्रित आले असून जरांगे पाटील यांना नाशिक मधून मोठे पाठबळ मिळेल.
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी आझाद मैदानावर मराठा आरक्षण आंदोलन होत आहे. या निमित्ताने राज्यातील मराठा आरक्षण समर्थकांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे. नाशिक नाशिक जिल्ह्यातून शेकडो वाहने आजच मुंबईकडे रवाना झाले.
आज सकाळी नाशिक शहरातील ग्रामदेवता कालिका मंदिर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविषयी बैठक झाली. यावेळी श्री कालिका देवी संस्थानचे अध्यक्ष अण्णा पाटील, छावा संघटनेचे प्रमुख करण गायकर, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष नितीन सुगंधी, मराठा सोशल ग्रुपचे बंटी भागवत, बाळासाहेब लोंढे राम पाटील नाना जाधव प्रफुल्ल वाघ मराठा महासंघाचे राजेंद्र शेळके आधी पदाधिकारी उपस्थित होते. मुंबईला जाणाऱ्या वाहनांवर लावण्यासाठी स्टिकर तयार करण्यात आले. त्याचे वाटप यावेळी करण्यात आले. शुक्रवारी सकाळी सातला ग्रामदेवतेचे दर्शन घेतल्यानंतर सर्व कार्यकर्ते वाहनांनी मुंबईकडे रवाना होतील, असे यावेळी ठरले.
या संदर्भात मराठा सेवा संघाचे नितीन सुगंधी यांनी मुंबईत होणारे आंदोलन निर्णायक स्वरूपाचे असेल. ग्रामीण भागातील आणि राज्यातील गरजवंत मराठा या आंदोलनात सहभागी झालेल्या दिसेल. राज्य सरकारने राजकारणातील नेत्यांना पुढे करून हे आंदोलन दडपता येईल, असा विचार करू नये, असे सांगितले.
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि छावा संघटनेचे अध्यक्ष करण गायकर यांनी मनोज जरांगे पाटील आज शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून मुंबईला रवाना होत आहेत. माझ्यासाठी स्वतःच्या प्राणाची ही चिंता न करता आरक्षणाचे आंदोलन ते पुढे नेत आहेत. राज्यातील सर्व मराठा नागरिक आणि कार्यकर्त्यांनी आता त्यांना निर्णायक ताकद द्यावी. 'जो मराठा असेल, तो मुंबई दिसेल, अशी घोषणा यावेळी उपस्थित त्यांनी दिली.
या निमित्ताने सर्वपक्षीय कार्यकर्ते एकत्र आल्याचे चित्र आहे. येवला मतदार संघातून कार्यकर्ते मुंबईतील आंदोलकांसाठी भाजी भाकरी घेऊन जाणार आहेत. मालेगाव शहरातून देखील कार्यकर्ते रेल्वेने मुंबईला जात आहे.
मराठा महासंघाचे शहर प्रमुख संजय पडोळ यांनी मखमलाबाद येथे बैठक घेतली. यावेळी विशेष वाहनांद्वारे कार्यकर्ते मुंबईत सहभागी होतील, असे नियोजन करण्यात आले. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय असेल. या आंदोलनात अनेक बिगर राजकीय कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.