Nagar NCP
Nagar NCPSarkarnama

Maratha Reservation : शरद पवारांविरुद्ध भडकावू विधान केल्याबद्दल, नामदेव जाधवांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक!

Namdev Jadhav Vs Sharad Pawar : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी पोलिसात तक्रार देत गुन्हा दाखल करण्याची केली मागणी.
Published on

Ahmednagar News : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी मराठा आरक्षणावरून भडकावू विधान केल्याबद्दल प्रा. नामदेव जाधव यांच्याविरोधात तोफखाना पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी ही तक्रार देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nagar NCP
Suresh Kute :बीड लोकसभेसाठी तगडा 'Plan B' म्हणूनच सुरेश कुटेंना भाजपमध्ये प्रवेश!

प्रा. नामदेव जाधव हे व्हिडिओ तयार करून समाजमाध्यमांवर व्हायरल करत आहेत. मराठा समाजाला आरक्षण का मिळाले नाही, यावरदेखील त्यांनीे व्हिडिओ तयार केले आहेत. मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्याचा ठपका त्यांनी शरद पवार यांच्यावर ठेवला आहे.

शरद पवार चारवेळा मुख्यमंत्री होते, त्यांनी कधीही मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी भूमिका घेतली नाही. शरद पवार यांची तुलना थेट जनरल डायरशी करून मराठा आरक्षणाचे हत्यारे असल्याचे नामदेव जाधव यांनीे व्हिडिओमध्ये म्हटले आहे. यासह अनेक आरोप नामदेव जाधव यांनी व्हिडिओत केले आहेत. यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

हा व्हिडिओ समाजमाध्यमांतून पाहिल्यानंतर राष्ट्रवादीचे नगर शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात धाव घेतली. राष्ट्रवादीचे नामदेव पवार, प्रकाश पोटे, अरिफ पटेल, उमेश भांबरकर, भीमराज कराळे, संदीप दळवी, लालू जगताप हे कार्यकर्तेदेखील उपस्थित होते. नामदेव जाधव विरुद्ध तक्रार दाखल करून गुन्हा नोंदवण्याची मागणी अभिषेक कळमकर यांनी या वेळी केली.

यासाठी हा खटाटोप आहे -

अभिषेक कळमकर यांनी सांगितले की, ''ज्येष्ठ नेते शरद पवार हे मराठा समाजास आरक्षण मिळावे, यासाठी सुरुवातीपासून प्रयत्नशील आहेत. असे असताना स्वतःला राजामाता जिजाऊंचे वंशज असल्याची थाप मारणारे प्रा. नामदेव जाधव यांनीे आरक्षणावरून मराठा समाज आणि तरुणांना चिथावणी दिली आहे.

तसेच ''शरद पवार यांच्याविषयी जाणीवपूर्वक खोटी, बिनबुडाची वक्तव्यं केली आहेत. समाजात शरद पवार यांच्याविषयी द्वेष निर्माण व्हावा, यासाठी हा खटाटोप आहे. सामाजिक शांतता भंग व्हावी, यासाठी नामदेव जाधव यांचे प्रयत्न आहेत. या प्रकारांना अटकाव करण्यासाठी जाधव यांच्याविरोधात गुन्हा नोंदवावा,'' अशी मागणीही कळमकर यांनी केली आहे.

दरम्यान, प्रा. नामदेव जाधव यांच्याविरोधात पुणे येथील कोथरूड पोलिस ठाण्यातदेखील तक्रारी अर्ज राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसच्या वतीने दाखल करण्यात आला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com