Suresh Kute :बीड लोकसभेसाठी तगडा 'Plan B' म्हणूनच सुरेश कुटेंना भाजपमध्ये प्रवेश!

Beed Loksabha Election : ... नेमके हेच गमक भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी हेरले आहे, अशीही जोरदार चर्चा आहे.
Suresh Kute Joined BJP
Suresh Kute Joined BJPSarkarnama
Published on
Updated on

Beed News : 'द कुटे उद्योग' समूहाचे चेअरमन सुरेश कुटे व या समूहाच्या कार्यकारी संचालिका अर्चना कुटे यांनी घाईघाईत नागपूरमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी कुटे हे लोकसभेसाठी भाजपचा तगडा बी प्लॅन म्हणून निवडले असल्याचे भाजपमधील सूत्रांचे म्हणणे आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Suresh Kute Joined BJP
Suresh Kute Joined BJP : अमित शाह नव्हे चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत सुरेश कुटेंचा झाला भाजपमध्ये प्रवेश!

आतापर्यंत राजकारणापासून कोसो दूर असलेले सुरेश कुटे यांच्या भाजप प्रवेशाची मागच्या पंधरवाड्यात चर्चा सुरू झाली. योगायोगाने त्यांच्या कंपन्यांची आयकर विभागाकडून नियमित तपासणी झाल्यानंतर त्यांच्या ज्ञानराधा मल्टिस्टेटला आलेल्या आर्थिक अडचणी आणि यामुळेच कुटेंनी भाजपचा मार्ग निवडला असल्याचे बोलले जात आहे.

मात्र, राज्य भाजप नेत्यांनी याकडे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्लॅन बी म्हणून त्यांना एन्ट्री दिल्याचे भाजपच्या एका फळीचे म्हणणे आहे. घाईत नागपूरला प्रवेश, जिल्ह्यातील कोणीच भाजपचा नेता नसणे हे यामागचे खरे इंगीत आहे.

कापड दुकान ते तिरुमला ऑईल, तिरुमला हेअर ऑईल, तिरुमला डेअरी, ओएओ इन्फो, डीएनआर इंडिया अॅटोटेक, तिरुमला ट्रेड्स, तिरुमला अॅग्रो, डीएनएस सप्लाय अशा विविध कंपन्यांचा डोलारा असलेल्या या कंपन्यांमध्ये १० हजारांवर अधिकारी व कर्मचारी आहेत. यात सर्वाधिक जिल्ह्यातील सुशिक्षितांना रोजगार मिळाला आहे.

विशेष म्हणजे या समूहाच्या कार्यकारी संचालिका अर्चना कुटे यांच्या कल्पनेतून जिल्ह्यातील महिलांना रोजगार उपलब्धतेसाठी स्वतंत्र कंपनी उभारलेली असून, बीडसारख्या ठिकाणी कंपनीच्या वाहनातून महिलांची घर ते कार्यालय अशी ने - आन कंपनीच्या आलिशान वाहनांतून केली जाते.

Suresh Kute Joined BJP
Beed Storage Pond:'फकीर कोण, मुर्गा कोण अन् अंडे कोण खातंय' ते दाखवू; आमदार धसांचा आजबेंवर प्रतिहल्ला

या उद्योग समूहामुळे जिल्ह्याचे नाव देशात पोहचले आहे. नैसर्गिक आपत्ती, सामाजिक कामातही कुटे समूह नेहमी पुढे असल्याने कुटे कुटुंबाद्दल समाजातही चांगले मत आहे. नेमके हेच गमक भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी हेरले आहे.

पर्यायाची चाचपणी सुरू -

१७ हजार कोटी रुपयांचे नेटवर्थ असलेल्या द कुटे ग्रुपचे चेअरमन सुरेश कुटे आतापर्यंत राजकारणापासून कोसो दूर होते. परंतु, त्यांचा अचानक प्रवेश हे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने सक्षम पर्याय शोधल्याचे बोलले जाते. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्याकडून शिवशक्ती परिक्रमेनंतर विविध वाहिन्यांवरील मुलाखती, भाषणांत नाव न घेता भाजप नेत्यांबाबत केलेल्या थेट वक्तव्यांची दखल भाजप नेत्यांनी घेतली व पर्यायाची चाचपणी सुरू केली असे दिसते.

या सर्व बाबींचा परिपाक म्हणून आता... -

देश भ्रष्टाचारमुक्त झाला का? या त्यांच्या वक्तव्याचा सूर थेट पंतप्रधानांवर होता, तर शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगारांसाठी काहीच होत नसल्याची टीका त्यांनी दसरा मेळाव्यातून केली होती. विशेष म्हणजे सर्वांना सोबत घेणारे नेतृत्व हवे, त्रास देणाऱ्यांचे घर उन्हात बांधू, असे आव्हान त्यांनी नाव न घेता भाजपतीलच त्यांच्या विरोधकांना दिले होते.

या सर्व बाबींचा परिपाक म्हणून आता भाजपने सुरेश कुटे व अर्चना कुटे यांना पर्याय म्हणूनच भाजपमध्ये घेतल्याचे राज्य भाजपच्या एका नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर ‘सरकारनामा’ला सांगितले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com