Maratha Reservation News : एकीकडे जरांगेंनी लावले प्राण पणाला तर नाशिकमध्ये 'सकल मराठा'चे बोंबाबोंब...

Manoj Jarange Patil News : राज्य सरकारच्या नावाने अक्षरशा शिमगा करण्यात आला...
Nashik Sakal Maratha News
Nashik Sakal Maratha News Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News : मराठा आरक्षणासाठी राज्यव्यापी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाच दिवस पूर्ण झाले. याबाबत सरकारच्या निषेधार्थ आज नाशिकमध्ये सकल मराठा समाजातर्फे बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सरकारच्या नावाने अक्षरशा शिमगा करण्यात आला. मराठा समाज बांधव संतप्त झाल्याचे दिसून आले. (Latest Maratha News)

Nashik Sakal Maratha News
शरद पवारांनी बोलावली बैठक, प्रशांत जगतापांनी दिली मोठी अपडेट | NCP Meeting | Marthi News

मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला आश्वासनानुसार जीआर काढण्याच्या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज शहरात सकल मराठा समाजातर्फे लाक्षणिक उपोषण आणि धरणे देण्यात आले. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देत बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने युवा वर्ग आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आशिष हिरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी हिरे यांनी राज्य सरकारने जरांगे पाटील यांच्या मागण्या गांभीर्याने घेऊन दिलेला शब्द पाळावा. राज्य शासन आणि मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) मागणी पूर्ण केल्याच्या घोषणा केल्या होत्या. आनंदोत्सव साजरा केला होता. प्रत्यक्षात झालेल्या निर्णयाचा अध्यादेश काढण्यासाठी प्रशासन चालढकल का करीत आहे. राज्य सरकारच्या मनात काही वावगे विचार सुरू असल्यास आम्ही ते सहन करणार नाही. सरकारने दिलेला शब्द पाळावा अन्यथा येत्या दोन दिवसात सरकारला मोठ्या आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा देण्यात आला.

शहर आणि जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज जिल्ह्याच्या काही शहरांमध्ये बंद पाळण्यात आला. मनमाड येथे सकाळपासून कडकडीत बंद होता. जिल्ह्याच्या अन्य शहरात देखील या आंदोलनाचा विस्तार करण्यासाठी संयोजकांनी आज तातडीची बैठक बोलाविली आहे. जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने सकल मराठा समाज आणि मराठा आरक्षण आंदोलनातील कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

Nashik Sakal Maratha News
Raju Shetti News : ...तर अधिकाऱ्यांना झोडपून काढणार; राजू शेट्टींचा थेट इशारा!

यावेळी सकल मराठा समाजाचे अध्यक्ष अमोल पाटील, संजय भामरे, विजय पाटील, पवन मटाले, योगेश गांगुर्डे, हर्षल चव्हाण, राम पाटील, जितेंद्र पाटील, योगेश पाटील, गोपी पगार, शुभम महाले, राहुल काकळीज यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com